
कोपरगाव प्रतिनिधी:- –
कोपरगाव प्रतिनिधी:-
माणसाला पहिल्या पासूनच पाण्याची ओढ आहे म्हणून माणसाच्या वसाहती नदिकाठी पाण्याजवळ निर्माण झाल्या
पाणी तेरा रंग कैसा
जिसमे मिलावे वैसा
जगाच्या पाठीवर पाणी जास्त आहे तसेच माणसाच्या अंगातहि पाणी जास्त आहे तरीसुद्धा डॉक्टर लोक माणसांना जास्त पाणी पिण्यास सांगतात काही माणसं लाथ मारीन तिथे पाणी काढीन या प्रवृत्तीची असतात
पाणी माणसाची मुलभूत गरज आहे काही माणसं पाणीदार असतात काही माणसं बोलून दुसऱ्याच पाणी पाणी करतात काही माणसं दुसर्याला पाण्यात पाहतात
माणसाला सदैव पाण्याची ओढ राहिली आहे काही लोक पैसा पाण्यासारखा खर्च करतात तर काही लोक पैश्यासारख पाणी जपून वापरतात
पाणी जीव कि प्राण जिथं पाणी टंचाई आहे तिथे पाण्या च मोल अनमोल असते भिषण उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होते तेव्हा जीव कासाविस होतो मुबलक पाणी पाहिल्यावर आनंद गगनात मावेनासा होतो भर ऊन्हात अंगाची लाही लाही होत असताना पाण्यात डुंबत असताना होणारा आनंद महान असतो काही मंडळी तर शक्य असेल तेव्हा वर्षभर पाण्यात डुंबत असतात नदिकाठी बंधाऱ्यात विहिरीत ऊडया मारून तासनतास पोहण्याचा व्यायाम रक्त प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतो
पाणी अडवा पाणी जिरवा
तळे राखील तो पाणी चाखील
पाणी जपून वापरा
पाणी एक चिंतन.
