

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्री.गणेश जयंती निमित्त कोपरगावचे ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेश मंदिर, गणपती चावडी, कोपरगाव येथे मानाची आरती धर्मभूषण कै.दत्तात्रेयपंत जोशी यांचे नातू व भारत प्रेसचे संचालक श्री.संदिपजी जोशी, मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष व साईगांव पालखी सोहळ्याचे प्रणेते श्री.सुनीलजी फंड, श्री.मनोजजी कपोते यांचे शुभहस्ते करण्यात आली आहे.



या प्रसंगी कोपरगांवातील विविध धार्मिक कार्यात अग्रभागी असलेले धर्मभूषण कै.दत्तात्रेयपंत जोशी यांचे नातू व भारत प्रेसचे संचालक श्री.संदिपजी जोशी,मुंबादेवी तरुण मंडळ व साईगांव पालखी सोहळा समितीचे वतीने कोरोना संकट काळात गरीब व गरजूंना मोफत अन्न छत्र लोकसहभागातून उभे करून सामाजिक बांधिलकी जोपासली तसेच कोपरगांवातील परंपरागत धार्मिक रुढी परंपरा जोपासण्या सोबत विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल श्री.सुनीलजी फंड, श्री.मनोजजी कपोते यांचा सन्मान करुन आशिर्वाद देतांना ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेश मंदिराचे अध्यक्ष व राज्य गुप्तवार्ता विभागाचे सेवानिवृत्त उपायुक्त श्री.सुभाषजी महाजन साहेब, भक्त मंडळाचे सदस्य श्री.मनोजजी गायकवाड, देवस्थानचे पुजारी श्री.मुकुंदजी कालकुंद्री, श्री.प्रदिपजी पदे यांचे सह गणेश भक्त उपस्थित होते.
