

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि. २० डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या सचिव मा. सौ. स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे सो. यांचे संपर्क कार्यालयात संत श्री गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री शरदनाना थोरात, कोनपा गटनेते श्री रवींद्रआण्णा पाठक, मा. नगराध्यक्ष श्री राजेंद्रजी सोनवणे, कै. माधवराव आढाव पतसंस्थेच्या चेअरमन श्री विजयराव आढाव पा,अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष श्री खालिकभाई कुरेशी, संजीवनी शुगरकेनचे संचालक श्री गोपीनाथ गायकवाड, श्री रवींद्रआण्णा रोहमारे, श्री बापुजी पवार, जेष्ठ नागरिक सेलचे श्री विष्णुपंतजी गायकवाड, व्यापारी सेलचे अध्यक्ष श्री मंदार जी बागले,श्री निलेशजी बोर्हाडे, श्री किरणजी सुपेकर,अनुसूचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष श्री शंकरजी बिर्हाडे, श्री कमलाकरजी भालेराव इ. मान्यवर उपस्थित होते.
