ग्रामपंचायत निवडणुकीतील मिळालेल्या यशानंतर युवा नेते विवेक कोल्हे यांनी श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन काम करण्याची जिद्द यामुळेच विवेक कोल्हे यांनी कोपरगाव मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांचे हे यश युवकांना निश्चितच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी केले.
नुकत्याच पार पडलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीतील मिळालेल्या यशानंतर युवा नेते विवेक कोल्हे यांनी श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी विवेक कोल्हे यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे उपस्थित होत्या. राज्यभरामध्ये भारतीय जनता पार्टीने ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश संपादन केले असून ही विजयाची घौडदौड राज्यभरात सुरू असतांना कोपरगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या 32 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 22 ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक मते व बहुमत मिळविण्यात भारतीय जनता पार्टीला मोठे यश मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *