ज्ञानाचे दान देणाऱ्या गोदावरी नदीकाठी कोकमठाण तीर्थक्षेत्री ब्रह्मलीन संत रामदासी बाबांची अखंड साधना भगवंत भक्तीचे चिरंतन स्मरण करून देणारी असल्याचे प्रतिपादन सरलाबेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
ज्ञानाचे दान देणाऱ्या गोदावरी नदीकाठी कोकमठाण तीर्थक्षेत्री ब्रह्मलीन संत रामदासी बाबांची अखंड साधना भगवंत भक्तीचे चिरंतन स्मरण करून देणारी असल्याचे प्रतिपादन सरलाबेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. रामदासी बाबांच्या 31 व्या पुण्यतिथी निमित्त अखंड राम नाम जप व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता शनिवारी काल्याचे कीर्तनाने झाली त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी महेश गायकवाड यांनी उदावंत ज्वेलर्स कोपरगाव यांच्याकडून खास तयार करून घेतलेला चांदीचा टोप दान दिला. शोभादेवी व शरद थोरात यांच्या हस्ते रामदासी बाबांच्या मूर्तीस ब्रह्मवृंदiच्या उपस्थितीत लघुरुद्राभिषेक करण्यात आला. नेवासा येथील चित्रकार सत्यजित भरतकुमार उदावंत यांनी रेखाटलेल्या रामदासी बाबांच्या शिल्पाचे लोकार्पण महंत रामगिरी महाराज, समर्थभक्त प्रसाद बुवा रामदासी, ह. भ. प. भागवतानंद महाराज, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या प्रसंगी शरद थोरात, कोपरगाव बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, कोसाकाचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहम, सेनेचे बाळासाहेब जाधव, कोल्हे कारखान्याचे संचालक अरुण येवले, बाळासाहेब नरोडे, यांच्यासह पंचक्रोशीतील रामदासी बाबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते, महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
याप्रसंगी चित्रकार सत्यजित भरतकुमर उदावंत यांनी हुबेहूब रामदासी बाबांचे चित्र रेखाटले त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला, त्याचा स्वीकार सौ. रंजना भरतकुमार उदावंत, रंगनाथ डहाळे, प्रमिला डहाळे, किरण डहाळे यांनी स्वीकारला. समर्थभक्त प्रसाद बुवा रामदासी याप्रसंगी बोलताना म्हणाले की, रामदास स्वामींनी जगाला संजीवनी दिली, तीच ध्वज पताका ब्रह्मलीन संत रामदासी बाबांनी पुढे नेली. महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, कुठलेही शास्त्र कला हस्तगत करणे जिकरीचे काम आहे. भगवंत हा सृष्टीचा कर्ता आहे, त्याच्या आज्ञेशिवाय येथील पान देखील हलत नाही. ब्रह्मलीन संत रामदासी बाबा यांनी अखंड साधनेतून कोकमठाण कर्मभूमीची ओळख भारतभर पोहोचवली, भक्त मंडळाने कोकमठाण तींनख्णीची ऊर्जा वाढवण्यासाठी अखंड राम नाम सप्ताह आयोजित करून, त्यात सर्वांना सामावून घेतले हे आपले परम भाग्य आहे. नामस्मरणातून अनेक संकट, अडचणी दूर होतात, वाल्याचा वाल्मिकी होण्याचे सामर्थ्य नामस्मरणात आहे, तेव्हा प्रत्येकाने आयुष्यात परमेश्वराचे नाम अखंड घेत राहावे. याप्रसंगी मसालेभात बुंदीचा महाप्रसाद भक्तांना वाटप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *