मनशांतीसाठी ध्यानधारणा व अध्यात्माची गरज:- सौ.चैतालीताई काळे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:-ज्या ज्या वेळी आपल्याला मानसिक अस्थिरता वाटते, त्या त्या वेळी मन शांत करण्यासाठी ध्यानधारणा मदत होत असते. शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. ध्यानधारणेतून रोगप्रतिकार शक्ती वाढून एक आंतरिक शक्ती स्त्रोत निर्माण होण्यास मदत होते. ध्यानामुळे मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो त्यामुळे मनशांतीसाठी ध्यानधारणा व अध्यात्म अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील होनल इन्चार्ज राजयोगिनी संतोषदीदी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या महाराष्ट्र संचालिका यांना गोवा राज्याकडून ग्लोबल कौन्सिल फॉर प्रोफेशनल एज्युकेशन मिशनच्या माध्यमातून डॉक्टरेट पदवी मिळविल्याबद्दल सौ. चैतालीताई काळे व कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा कोपरगाव येथे नवनिर्मित वाढीव सत्संग हॉलचे उदघाटन कार्यक्रम प्रसंगी सौ. चैतालीताई काळे बोलत होत्या.
याप्रसंगी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी, ब्रह्माकुमारी सरला दीदी, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष चवंडके, नगरसेवक मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, परमपूज्य ह.भ.प. उंडे महाराज, राजेंद्र वाकचौरे, डॉ. रामदास आव्हाड, डॉ. महेंद्र गोंधळी, डॉ. कापडणीस, डॉ. नाईकवाडे, अशोक आव्हाटे, नारायण लांडगे, योगेश नरोडे, चंद्रशेखर म्हस्के, सौ. रश्मीताई कडू, पत्रकार मनीष जाधव आदी उपस्थित होते.
फोटो ओळ- राजयोगिनी संतोषदीदी प्रजापिता ब्रह्माकुमारी यांनी डॉक्टरेट पदवी मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना सौ. चैतालीताई काळे समवेत राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी, ब्रह्माकुमारी सरला दीदी, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *