
कोपरगाव प्रतिनिधी:-
मनाची रंगपेटी एखाद्या तरी छंदानं व्यापलेली असावी . छंदिष्ट मागासं स्वतःतच एखाद्या मुक्तछंदासारखी घुमत असतात . छंदाचं वैभव वाढलं की प्रसिध्दीचं एखादं मोरपीस येते . पण त्या पिसातही ही मायास फारशी गुंतत नाहीत . कारण जन्माला येतानाच ती ‘ पिसं ‘ घेऊन आलेली असतात . असे वेड लाभणं याहून – दुसरी अमीरी कुठली ? या खजिन्याला कुणाचीच भीती नाही- ना चोरांची ना इन्कमटॅक्सची . कुबेराला स्पर्श करण्यासाठी , देवाचेच हात हवेत !
