के. जे. सोमैया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये “जनगणना माहिती व भूगोलातील संशोधन” या विषयावर व्याख्यान आयोजित..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
के. जे. सोमैया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये भूगोल विभाग व अंतर्गत गुणवता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने २०२१ मध्ये येणार्‍या जनगणेचे औचित्य साधून “जनगणना माहिती व भूगोलातील संशोधन” या विषयावर शनिवार दिनांक 23/10/2021 रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या डॉ. रत्नप्रभा जाधव , एस. एन. डी. टी. विद्यापीठ, पुणे ह्या होत्या. डॉ. रत्नप्रभा जाधव ह्या भूगोल विभाग, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात कार्यरत असून अनेक भौगोलिक संशोधनात त्यांचे महत्वाचे योगदान आहे. ह्या व्याख्यानात त्यांनी भारतीय जनगणना त्याचा इतिहास आणि येणारी २०२१ ची जनगणना व त्यात झालेले आद्ययावत बदल तसेच ऑनलाइन जनगणनेचे स्वरूप व या महितीचे भूगोल सांशोधनात होणारे उपयोग या बद्दल मोलाची माहिती दिली. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यानी आपला संशोधात्मक दृष्टीकोण कसा वाढवावा व संशोधनात जनगणनेच महत्व याबद्दल ऑनलाइन मार्गदर्शन केले.
ह्या व्याख्यानास के. जे. सोमैया महाविद्यालयामधील विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक असे एकूण 62 व्यक्तींनी सहभाग नोंदवला. या व्याख्यानामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ. गणेश चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र-संचालन व पाहुण्याचा परिचय प्रा.लीना त्रिभुवन यांनी केले. तर आभार डॉ. वसुदेव साळुंके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. संतोष पगारे, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षेचे समन्वयक प्रा. विजय ठाणगे, कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे तसेच भूगोल विभागचे प्रा. आकाश सोनवणे, प्रा. राजेंद्र पवार, प्रा. संतोष आहेर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी परिश्रम घतले. या कार्यक्रमासाठी कोपरगाव तालुका एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्षा मा. श्री अशोकराव रोहमारे व साचिव अॅड. संजीवदादा कुलकर्णी, विश्वस्त श्री. संदीप रोहमारे यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *