
कोपरगाव प्रतिनिधी:-
१७ डिसेंबर १९८६ रोजी कंबोडियाचया बोगोटा इथे ‘एल स्पेक्टाडाॅर’ वर्तमानपत्रा च्या गुलेर्मो कॅनो इसाझा या पत्रकाराची त्यांच्या कार्यालया समोरच ड्रग माफियांनी क्रूर हत्या केली. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत इसाझा अंमली पदार्थांच्या व्यापारा विरोधात लिहीत राहिला पण त्याने घाबरून तडजोड केली नाही.
तर याच इसाझाच्या नावे युनेस्कोकडून १९९७ पासून वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी,ते टिकवण्यासाठी अद्वितीय योगदान देणाऱ्या पत्रकारासाठी एक पुरस्कार दिला जातो.
याशिवाय ३ मे हा दिवस ‘जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा करताना जगातील सर्व देशांच्या सरकारांना वृत्तपत्र स्वातंत्र्याचं महत्व कायम लक्षात ठेवावं आणि तसं वागावं,याची आठवण यानिमित्ताने करून दिली जाते.
आज या सगळ्याची आठवण येते आहे, कारण आपल्या देशातील माध्यमांची परिस्थिती!
पत्रकारांऐवजी त्यांना हवेत “आशय वाहक” आणि संपादकां ऐवजी हवेत “आशय व्यवस्थापक”,
सर्वच माध्यमांवर नियंत्रण आणि समविचारी नियंत्रक !
पण चित्र मोठे विदारक!
तिकडे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन साजरा होताना आपल्याकडे आक्रसत चाललेली माध्यमं मरणासन्न होताहेत,खप कमी होताहेत,वाहिन्यांची दर्शक संख्या आणि विश्वासार्हता कमी होतेय! अंकुश कोणाचा कोणावर आहे? लोकशाहीचे चारही स्तंभ एकमेकांशी भांडताहेत,आरोप प्रत्यारोप करताहेत, संशय व्यक्त करताहेत, जनसामान्य अवाक्, किंकर्तव्यमूढ आणि संभ्रमित असहाय अवस्थेत !
अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकवायचं तर कुठे, कुणी आणि कसं? हे मोठे प्रश्न माध्यम क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरूण पिढी पुढेच नाहीत तर अनेक वर्षं काम करणाऱ्यांनाही पडले आहेत.सोशल मिडीयाद्वारे अजून तरी मुक्तपणे व्यक्त होता येतंय!
चला तर मग आजचा दिवस तरी वृत्तपत्र स्वातंत्र्याचा जयघोष करायला काय हरकत आहे.
जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त तमाम पत्रकार मित्रांना हार्दिक शुभेच्छा…
अँड.नितीन पोळ
लोक स्वराज्य आंदोलन…
