
कोपरगाव प्रतिनिधी:-
संगीत रणभूमीवर सहा दशके अधिराज्य गाजविणाऱ्या प्रसिद्ध गायिका कीर्ती शिलेदार यांचे आज वयाच्या ७० व्या वर्षी दुःखद निधन झाले. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवले होते. त्यांनी वयाची साठ वर्षे मराठी रंगभूमीसाठी दिली. त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. मराठी संगीत रंगभूमीची सेवा साठहून अधिक वर्षे अविरतपणे केली. त्यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने शिलेदार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय शिलेदार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली !
छगन भुजबळ,
मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा.
