
कोपरगाव प्रतिनिधी:- पापी पेट का सवाल मिटविण्यासाठी माणूस कोणतेही कष्ट सहन करीत असतो स्वतः च पोट संसार प्रपंच चालविण्यासाठी अतोनात मेहनत घेतली जाते मग ती मजुरी रोजंदारी नोकरी सेवा व्यवसाय वा धंदा एका जागी बसून हिंडून फिरून पैसा मिळवला जातो काही वर्षांपूर्वी अनेक गोष्टी दुर्लक्ष दुर्मिळ असत आठवडी बाजार शिवाय तालुक्याच्या ठिकाणी फक्त मिळत परंतु कधीकधी काही फिरते विक्रेते खेडेगावात वाड्यावस्त्यांवर सर्व प्रकारच्या वस्तू विकण्यासाठी येत असत कालौघात अनेक बदल झाले जागतीकिकरण मुक्त बाजारपेठ दळणवळण व्यवस्था सुलभतेने उपलब्ध रस्ते विकास वाहतूक व्यवस्था सुरळीत आर्थिक प्रगती झाल्याने फिरत्या विक्रेत्यांना मंदिचे दिवस येऊ लागले
पूर्वी आठवडे बाजारात डास ढेकूण झुरळ पाली मारण्यासाठी औषध एका काठावर लावून एखादा माणूस उभा असे आणि जागाही नक्की असे नियमितपणे औषधे घेणारे विश्वास ठेवून खरेदी करत
आज मोठा बदल झाला आहे दुकानांच्या रेलचेल झाली आहे लोक रस्त्यावर खरेदी साठी न डगमगता दुकानात जाऊन खरेदी साठी जात आहेत परिणामी काही फिरते विक्रेते आर्थिक संकटाचा सामना करत आहेत
