गर्भलिंग निदान कायद्यावर जिल्‍हा रुग्‍णालयात कार्यशाळा संपन्‍न..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा 1994 ची अंमलबजावणी प्रभावीपणे करणेकरिता, जिल्‍हा रुग्‍णालय, अहमदनगर येथे सर्व तालुक्‍यातील पीसीपीएनडीटी तालुका समुचित प्राधिकारी, तसेच महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी यांची कार्यशाळा नुकतीच घेण्‍यात आली.
या कार्यशाळेस जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, डॉ. भुषणकुमार रामटेके, जिल्‍हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव न्‍यायाधीश श्रीमती रेवती देशपांडे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. सोनाली बांगर, पीसीपीएमडीटी विधि समुपदेशक अॅड. श्रीमती सारीका सुराशे, वैद्यकिय अधिकारी डॉ. रामेश्‍वर काटे आदी उपस्थित होते.

        या कायद्याबाबत मार्गदर्शन करतांना श्रीमती देशपांडे यावेळी म्‍हणाल्‍या,  मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण हे कमी होत असल्‍यामुळे त्‍याचे दुष्‍परीणाम समाजामध्‍ये दिसून येतात, त्‍यामध्‍ये त्‍यांनी उपस्थित अधिकारी यांना पीसीपीएनडीटी कायद्यामध्‍ये दिलेल्‍या  तरतूदी प्रमाणे काय करायला हवे, तसेच तपासणी बाबतचे मार्गदर्शन केले. समाजामध्‍ये कायद्याचे मोठ्या प्रमाणात जन जागृती होणे अपेक्षित आहे.

        गर्भलिंग निदान करुन गर्भपात होत असल्‍यामुळे याकडे आपण गांभिर्याने लक्ष देऊन कायद्याचे उल्‍लंघन करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशीर कार्यवाही करावी. तसेच अशा व्‍यक्तिंविरूध्‍द समाजातील सर्व सामान्‍य जनतेने पुढे येऊन शासनाच्‍या 18002334475 या हेल्‍पलाईन क्रमांकावर तथा www.amchimulgi.gov.in या संकेतस्‍थळावर तक्रार नोंदवावी. असेही श्रीमती देशपांडे यांनी यावेळी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *