
कोपरगाव प्रतिनिधी:-
सर्वसाधारणतः प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम तसेच विशेष प्रसंगी राष्ट्रध्वजाचा वैयक्तिकरीत्या वापर केला जातो. अशा कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वज इतस्ततः पडलेले दिसून येतात. अशा प्रकारे राष्ट्रध्वजाची अवहेलना होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
त्याचप्रमाणे ध्वजसंहितेतील सर्व नियमांचे व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच खराब झालेले माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी असे राष्ट्रध्वज तहसील कार्यालयात सुपूर्द करावेत. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
