सोपानराव उगले यांचे दुःखद निधन…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील मूर्शतपूर येथिल प्रगतशील शेतकरी सोपानराव श्रीपतराव उगले यांचे वृध्दापकाळाने मंगळवार दि १ जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मृत्युनंतर त्यांच्या कुटूंबियांनी प्रवरा मेडीकल काॅलेजला नेत्रदान केले व काॅलेजनेही गरजु व्यक्तीला कै. उगले यांचे नेत्र देवुन दृष्टीहिनाला दृष्टीही दिली.
कै. सोपानराव उगले यांचे वडील १९६१ साली स्वर्गवाशी . त्यांच्यावर इतर भावंडे व बहिनींची जबाबदारी पडली. मात्र सर्वांना बरोबर घेवुन त्यांनी सर्वांचे शिक्षण पुर्ण केले. संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे माजी मुख्य लेखापाल श्री शिवराम श्रीपतराव उगले यांचे ते थोरले बंधु होते. सर्वांशी मिळुन मिसळून वागणे, विविध निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेणे, अनेकांच्या अडचणी सोडविणे, असे सर्वांनाच हवेहवेसे व्यक्तीमत्व कै. सोपानराव यांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव दादासाहेब सोपानराव उगले, मुलगी अलका अनिल जाधव, बंधु शिवराम व विनायक उगले, नातवंडे असा मोठा परीवार आहे. कै. सोपानराव उगले यांच्या निधनाने मूर्शतपूर व पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरली असुन माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार व भाजप प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे यांनी तिव्र दुःख व्यक्त केले आहे.

फोटो:- कै. सोपानराव श्रीपतराव उगले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *