मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पुण्याचे प्रथम महापौर कै.बाबुराव सनस यांच्या पुतळ्यास अभिवादन…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (पुणे):-पुणे शहराचे प्रथम महापौर कै.बाबुराव नारायणराव सनस यांच्या स्मृतीदिना निमित्ताने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या पुणे शहरातील पुतळ्यास पुष्पहार करून अभिवादन केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ता अंकुशराव काकडे, माजी खासदार समीर भुजबळ, पुण्याच्या उपमहापौर संगीता वाडेकर, आबा बागुल, नगरसेवक सरस्वती शेंडगे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, सुभाष सनस यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *