
पुणतांबे प्रतिनिधी:- बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधुन जनार्दन स्वामी हाँस्पिटल, कोकमठान. ता. कोपरगाव. तसेच शिवसेना शाखा पुणतांबे, यांच्या संयुक्त विद्यमाने पुणतांब्यात आज सर्वरोग ऊपचार व शस्रक्रिया निदान शिबीर पार पडले.कोपरगाव शिवसेनेचे भरत मोरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.
या शिबीरात सुमारे चारशे रुग्नांनी सहभाग नोंदवुन तपासनि करुन मोफत औषधे घेतली. ग्रामिन रुग्नालयात पार पडलेल्या या शिबीराला मोठा प्रतिसाद लाभला.
शिवसेना शहर प्रमुख महेष कुलकर्णी, नवनाथ वायकर. व शिवसेना कार्यकर्ते यांनी हे शिबीर आयोजीत केले होते. या शिबीरात दंत विभाग तज्ञ डाँ पुजा कातकडे. नेत्र विभाग तज्ञ डाँ प्रशांत सगळगिळे. पंचकर्म विभाग प्रमुख डाँ दिपक राजगुरु,आदींनी शिबीरात सहभागी झालेल्या रुग्नांची तपासनि केली. ज्या रुग्नांनवर शस्रक्रिया अवश्यक होती त्यांना जनार्दन स्वामी रुग्नालयात येण्याचा सल्ला दिला.
नव्यानेच ऊभारन्यात आलेल्या श्री जनार्दन स्वामी रुग्नालयाची माहीती रुग्नालय व्यवस्थापनाने रुग्नांना दिली. तसेच रुग्नालयात ऊपचार धेणा-या रुग्नांना महात्मा फुले जन आरोग्य सेवा ऊपलब्ध असल्याचे सांगीतले, ग्रामीन रुग्नालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाँ.कुंदन गायकवाड, श्री जनार्दन स्वामी रुग्नालयाचे अध्यक्ष प्रसाद कातकडे, यांनी शिबीरस्थानी भेट दिली.
शिवसैनिक शंकर शेलार, रमेश लोळगे, संपर्क प्रमुख ईश्वर वहाडणे, अक्षय पडवळ, आदींचे या आरोग्य शिबीरासाठी मोठे सहकार्य लाभले.

फोटो ओळी:-
शिवसेना यांच्या वतिने घेतलेल्या सर्वरोग निदान शिबीरात रुग्नांची तपासनि करतांना जनार्दन स्वामी रुग्नालयाचे वैद्यकिय अधिकारी. व शिवसैनिक.
