“लोक शाहीर अण्णा भाऊ साठे पूर्णाकृती आश्वासनांचा केक कापून वाढदिवस साजरा”…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
मागील बारा वर्षांपासून कोपरगाव शहर व तालुक्यातील समाज बांधव सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा व्हावा अशी मागणी करत आहे कोपरगाव शहरातील आजी माजी प्रस्तापित नेत्यांच्या नगर अध्यक्षांनी आता पर्यंत फक्त आश्वासने दिली पाच वर्षांपूर्वी लोक प्रिय अध्यक्ष यांनी देखील पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे आश्वासन दिले त्यांनी योग्य तो पाठपुरावा देखील केला मात्र प्रत्येक निवडणुकी पूर्वी समाज बांधवांना पूर्णाकृती पुतळा लवकरच बसविण्यात येईल असे आश्वासन दिले जाते
या अश्वासनाचा जानेवारी महिन्यात केक कापून वाढदिवस साजरा केला जातो मात्र लवकरच नगर पालिकेची मुदत संपत आहे व दोन तीन दिवसात जनरल मिटिंग होणार आहे या पार्श्वभूमीवर या वर्षी दि१६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी नगर पालिके समोर या आश्वासनांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला
या वेळी नगर पालिकेत ठेवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्या नंतर नगर पालिकेच्या दारात अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच बसवावा अशा घोषणा देत अश्वासनाचा केक कापून लवकरच पुतळा बसवावा अशी मागणी केली
या वेळी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ,लहुजी टायगर सेनेचे शरद त्रिभुवन व सुजल चंदन शिव यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया मांडल्या व नगर पालिका निवडणुकी पूर्वी कोपरगाव शहरात अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा सन्मानाने बसवला नाही तर आगामी निवडणुकीत मातंग समाज बांधव योग्य प्रतिउत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ म्हस्के रंगनाथ मरसाळे,अमोल सौदागर, सचिन अहिरे, सनी ताकवले, रमेश भोपे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *