कोपरगाव नगरपालिका शाळा नं.६ येथे नुकताच जागतिक शिक्षक दिनानिमित्त शिक्षक गुणगौरव सोहळा पार पडला:- सुनिलजी रहाणे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपालिका शाळा नं.६ येथे नुकताच जागतिक शिक्षक दिनानिमित्त शिक्षक गुणगौरव सोहळा पार पडला. जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य न. पा. म न. पा. शिक्षक संघाच्या सौजन्याने नगरपालिका गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशासनाधिकारी मा. मोहनीश तुंबारे साहेब, प्रमुख पाहुणे श्री नवनाथ अकोलकर -राज्य संघटक, श्री फारुख शहा -जिल्हाध्यक्ष, श्री चांगदेव ढेपले, श्री विलास माळी -सरचिटणीस, श्रीम. सविता साळुंके -महिला आघाडी प्रमुख, श्री अरुण पगारे -जिल्हा सदस्य, मुख्याध्यापक, व सत्कामुर्ती शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुनिल रहाणे यांनी केले.या प्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त श्रीम आरती कोरडकर, श्रीम. सविता राहीन्ज, नेशन बिल्डर अवॉर्ड प्राप्त श्रीम नसरीन इनामदार, नवनियुक्त जिल्हापदाधिकारी व गुणवंत शिक्षकांचा मान्यवरांचे शुभहस्ते सन्मान करण्यात आला. प्रशासनाधिकारी यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीकरिता मार्गदर्शन करून शिक्षकांचे कौतुक केले.श्री अकोलकर, श्री शहा व श्रीम साळुंके, श्री ढेपले यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीम सुनीता इंगळे यांनी सूत्रसंचलन केले. मुख्याध्यापक श्री भरत आगळे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता श्रीम कल्पना निंबाळकर, श्रीम निर्मला बनसोडे, श्रीम स्मिता सोमोसे, श्री माणिक कदम, श्री प्रशांत शिंदे,श्रीम. ज्योती पवार,श्रीम तेजस वारुळे, श्री अमोल कडू, श्री अर्जुन शिरसाठ, श्री संतोष जाधव,श्री सनी गायकर, श्री गोपाळ कोळी यांनी नियोजन केले. श्री विलास माळी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *