
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगर पालिकेचा
आय लव्ह कोपरगाव ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला असून सदर उपक्रम धारणगाव रोड वर राबविण्यात यावा कारण नगर पालिकेच्या सौजन्याने हा रोड म्हणजे ऐतिहासिक असा आहे
बस स्टॅण्ड वरून उतरल्यावर या रोड च्या सुरुवातीलाच संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे पुढे गेल्यावर जवळच किशोर वाईन्स चे दुकान आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला सुप्रसिद्ध मिनार चहाचे दुकान आहे पुढे आल्यावर अंडी विक्री करणारे दोन दुकान असून जवळच खमंग वडे पाव व भजे विक्री करणारे सुप्रसिद्ध मोरे वडापाव चे व इतरही वड्याची दुकाने आहेत थोडे पुढे गेल्यावर कोपरगाव पोष्ट ऑफिसची भव्य इमारत असून त्याच्या समोर चिकन टिक्का विक्री करणारे अनेक स्टॉल आहेत पुढच्या बाजूला चांगले खाण्याचे पान मिळणारी गाडी असून जवळच बोकड व चिकन विक्री करणारे दुकान आहे तसेच पुढे आल्यावर मेडीकल दुकान कोपरगाव शहरात नव्याने झालेले मिसळ दुकान अशी खवय्यांची खास काळजी घेणारी दुकाने आहेत
या रस्त्याने असलेल्या खड्ड्यातून चालताना कोपरगाव कर नागरिकांना डोंगर दर्यातून चालण्याचा अनुभव मिळत असतो
डॉ फडके यांच्या हॉस्पिटल जवळ नारळ पाणी विक्री करणारी दुकाने तर समोरच मा आमदार साहेब यांचे संपर्क कार्यालय आहे
आजून पुढे छ संभाजी महाराज यांचे पूर्णाकृती स्मारक व आजूबाजूला श्री गणेश भेळ कॉर्नर वडे आदी सर्व पर्यटन स्थळाला साजेशी पार्श्वभूमी असून या रस्त्यावर कोपरगाव नगर पालिकेने आय लव्ह कोपरगाव संकल्पना राबविल्यास कोपरगाव च्या जनतेला हा ऐतिहासिक वारसा नक्की लक्ष्यात राहील तरी नगर पालिकेने धारणगाव रस्त्यांचा विचार करावा असे वाटते
अँड.नितीन पोळ
लोक स्वराज्य आंदोलन
9860733420
9175894420
