यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अध्यासन सल्लागार समितीवर समाधान जेजुरकर यांची निवड…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अध्यासनाच्या सल्लागार समितीवर राष्ट्रवादी ओबीसीसेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सावित्रीबाई फुले अध्यासन केंद्र, मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा समन्वयक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांच्याकडून नियुक्ती पत्र समाधान जेजुरकर यांना प्राप्त झाले आहे. त्याबद्दल आज यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी समाधान जेजुरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सावित्रीबाई फुले अध्यासन कार्यरत आहे. या अध्यासनातर्फे लिंगभाव समानता, महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या प्रश्नांशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याबाबत विद्यापीठाच्या कुलगुरुंनी अध्यासनाच्या सल्लागार समितीवर समाधान जेजुरकर यांची नियुक्ती करण्यास संमती दिली आहे. त्यानुसार ३ वर्षासाठी अध्यासन सल्लागार समितीवर काम करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *