पुरस्कार सत्कार्यला प्रेरणादायी असतात:- बाळासाहेब लावरे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- माणसाने सदैव सत्कर्म सदाचारी विचारी राहून कर्म केले तर सत्कार्य करणाराचा कुणीतरी दखल घेऊन पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असतात पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्या नंतर असे पुरस्कार कार्याला प्रेरणा देतात’ असे विचार बालकवी मुख्याध्यापक बाळासाहेब लावरे यांनी व्यक्त केले
कोपरगाव येथील साहित्यिक छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांनी साहित्य व छायाचित्रण कलेतील योगदानाबद्दल शब्द गंध साहित्यिक परिषद ( महाराष्ट्र राज्य) श्रीरामपूर शाखा लोकरंग बहुउद्देशीय संस्था वडाळा महादेव करीअर काॅमपुटर यांच्या संयुक्त विद्यमाने गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त आयोजित कविसंमेलन व पुरस्कार समारंभात जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाले
आहे
साहित्यिक छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांनी आजतागायत अनेक नवोदितांना प्रेरणा देणारे उपक्रम राबविले आहेत कथा कविता लेख प्रकाशित करून वाचकांच्या मनात चैतन्य निर्माण केले आहे अनेक नवोदित छायाचित्रकारांना उत्तेजन देण्यासाठी छायाचित्र स्पर्धा आणि कविता/ सामाजिक लेखांची स्पर्धा आयोजित करून प्रमाणपत्र ग्रंथ देऊन सन्मानित केले आहे इत्यादी कार्याचा गौरव म्हणून गौरविण्यात येणार आहे त्या प्रीत्यर्थ कवि बाळासाहेब लावरे यांनी हेमचंद्र भवर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या या प्रसंगी चंद्रमा कलर फोटो संचालीका सौ मंगल भवर हर्षदा वंजारे आकाश जाधव अभीजीत भवर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *