


कोपरगाव प्रतिनिधी (नाशिकरोड):-
येथील वनिता विकास मंडळ प्रशालेत रोटरी क्लब ऑफ नाशिक कॉस्मोपोलिटीयन तर्फे मुलींच्या स्वसंरक्षणासाठी मार्क मार्शल आर्ट्स नाशिक तर्फे मार्गदर्शन करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्क मार्शल आर्ट्स चे संस्थापक मोहम्मद आरिफ खान,मॅनेजिंग डायरेक्टर सानिया मो. आरिफ खान आणि त्यांचे सहकारी मिथुन मंडाले, संदीप शर्मा यांनी प्रात्यक्षिकासह हे मार्गदर्शन केले.मुलींनी आपले स्वसंरक्षण कसे करावे,रस्त्यात कुणी अडविले,निष्कारण त्रास दिला,मुलींना एकटे गाठून विचित्र हावभाव केला,चित्र विचित्र बोलले,कुणी नसताना हात धरून त्रास देण्याच्या प्रयत्न केला तर आपले संरक्षण कसे करावे याबद्दल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
या सर्वांचा रोटरी क्लब ऑफ नाशिक कॉस्मोपोलिटीयन च्या प्रेसिडेंट डॉ.कविता भालेराव मॅडम यांनी सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.



प्रथम या सर्वांचे मुख्याध्यापक अनिल नागरे सर यांनी स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन पाठक सर,तर आभार जेष्ठ शिक्षिका सरिता पाचपांडे मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक कॉस्मोपोलिटीयन चे डॉ.रुपेश गुजर,धनेश अडवाणी,सविता अडवाणी तसेच वनिता विकास मंडळ संस्थेच्या सहकार्यवाह कविता देशपांडे मॅडम,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा पाचपांडे मॅडम, प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

