अंगणवाडी सेविका व मदतनिसांना प्रोत्साहन भत्ता देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस म.न.पा कर्मचारी संघटनेची मागणी…

कोपरगाव

अंगणवाडी सेविका व मदतनिसांना प्रोत्साहन भत्ता द्या:- राष्ट्रवादी काँग्रेस म.न.पा कर्मचारी संघटना शहराध्यक्ष कविता कर्डक…

कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):-
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या काळात काम केलेल्या सर्व स्तरावरील कर्मचारी, अधिकारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस म.न.पा कर्मचारी संघटनेच्या शहराध्यक्ष कविता कर्डक यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत अनिता भामरे, सरिता पगारे, रंजना कुंदे, संजीवनी जाधव, योगिता आहेर यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस म.न.पा कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोनाने थैमान घातले असतांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावरुन विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. सदर योजना राबविण्याकरिता व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता नगरपालिका क्षेत्रातील सर्वच स्तरावरील कर्मचारी अधिकारी अंगणवाडी सेविका व मदतनीस हे आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र परिश्रम करून कोरोना संसर्गजन्य रोगांपासुन शहर मुक्त करण्यासाठी प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या देण्यात आलेल्या आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम केलेल्या सर्व संवर्गातील सफाई कर्मचारी, लिपिक, वरिष्ठ लिपिक, अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, यांनी चांगली सेवा बजावली होती. अशा कर्मचारी व अधिकारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना बाराव्या, तेराव्या, चौदाव्या वित्त आयोगाच्या जमा असलेल्या व्याजातून एक हजार रुपये प्रति महिना प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या आदेशाच्या अनुषंगाने नगरपालिकामध्ये पहिल्या टप्प्यात काम केलेल्या सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांना दि. १ एप्रिल २०२० ते ३० ऑक्टोबर २०२२ या कालवधीत काम केलेल्या न.पा. कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देणे बाबतची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.
यावर मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस म.न.पा कर्मचारी संघटना शहराध्यक्ष कविता कर्डक यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *