सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या कच्च्या साखर निर्यातीच्या पहिल्या साखर पोत्याचे पुजन:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या कच्च्या साखर निर्यातीच्या पहिल्या साखर पोत्याचे विधीवत पुजन तज्ञ संचालक व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, एच. आर. मॅनेजर प्रदीप गुरव, वाल्मीकराव भिंगारे, चिफ केमिस्ट विवेक शुकला, मुख्य लेखापाल एस. एन. पवार, उपमुख्य लेखापाल प्रविण टेमगर, साखर गोदाम प्रमुख भास्करराव बेलोटे, बाळासाहेब रूपनर उर्फ हुंडेकरी, व्यापारी राजेंद्र शिंगी, संरक्षण अधिकारी रमेश डांगे, आदि खातेप्रमुख, उप खातेप्रमुख, कामगार उपस्थित होते.
श्री. विवेक कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत अडचणीवर मात करत उस उत्पादक सभासद शेतक-यांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत आहे. कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली साखर उत्पादनात गुणवत्तेला विशेष महत्त्व देऊन त्यांचे व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने चालु गळीत हंगामात उत्पादित होणा-या साखरेपैकी ५ लाख क्विंटल कच्च्या साखर निर्यातीचा करार करण्यात आला असुन त्याच्या पहिल्या पोत्याचे पुजन आपल्या हस्ते झाले ही बाब कौतुकास्पद आहे. साखरेबरोबरच उपपदार्थ निर्मीतीतुन तसेच उसाच्या रसापासून थेट इथेनॉल उत्पादन करून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याने देशात सर्वप्रथम नांवलौकीक मिळविला आहे असेही ते म्हणाले. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.

फोटोओळी:-
कोपरगांव सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या कच्च्या साखर निर्यातीच्या पहिल्या साखर पोत्याचे विधीवत पुजन तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवगे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, एच. आर. मॅनेजर प्रदीप गुरव, वाल्मीकराव भिंगारे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *