कृषी विभागाने पीक नियोजन बैठकीचे आयोजन करावे:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून कृषी विभागाने पीक नियोजन बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की दर वर्षी शेतकरी आहे ते परंपरागत पिके घेतात मात्र अस्मानी सुलतानी संकटांनी पिके सोडून द्यावी लागतात तसेच पीक तयार झाल्या नंतर देखील योग्य भाव न मिळाल्याने मातीमोल भावाने विक्री करावे लागते त्यामुळे कृषी विभागाने मागील वर्षीच्या शिल्लक साठ्याची माहिती व आगामी वर्षात कोणती पिके घेणे आवश्यक आहेत नवीन आलेले वाण त्याच प्रमाणे खते, बीबियाणे यांची असलेली उपलब्धता शेतकऱ्यांची बोगस बियाणे पासून फसवणूक होऊ नये म्हणून काय व कोणती उपाय योजना केली या बाबत चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे
अशा प्रकारे योग्य वेळी माहिती न मिळाल्या मुळे बी बियाणे,औषध खते विक्रेत्या कडून शेतकऱ्यांची फसवणूक होते मागील वर्षी पावसाने सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झाले त्याचे परिणाम तेलाचे भाव वाढण्यात झाले याउलट दुसऱ्या पिकांना बाजार भाव उपलब्ध नाही या परिस्थितीत शेतकरी स्थानिक बियाणे,खते, औषध विक्रेते यांच्या सल्ल्याने पिकाचे नियोजन करतात
आधीच साथीच्या आजाराने शेतकरी हवालदिल झालेला आहे अशा परिस्थिती पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे म्हणून पीक नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात यावे व प्रत्येक गावात नेमलेल्या कृषी सहाय्यक यांच्या मार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असे या पत्रकात म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *