नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची संजीवनी उद्योग समुहास भेट…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मंगळवारी संजीवनी उद्योग समुहास भेट देवून रासायनीक प्रकल्प व साखर उत्पादन विभागाची पाहणी केली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी त्यांचा सत्कार करून सहकारी साखर कारखानदारीत अत्याधूनिकता जोपासत कारखान्यांत केलेल्या नाविन्यपुर्ण बदलाची माहिती दिली.
प्रारंभी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी स्वागत केले. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख आदि उपस्थित होते.
श्री. बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने उपपदार्थ निर्मीती बरोबरच सहवीज निर्मीती, आसवानीतुन निघणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया करून बायोगॅस व त्यावर वीज निर्मीती, शेतक-यांसाठी अत्यंत कमी खर्चात जीवाणू कंपोष्ट खत निर्मीतीसह दैनंदिन गाळप क्षमतेत अत्याधूनिकता आणत कमी खर्चात जास्तीचे उस उत्पादन कसे येईल याबाबत सभासद शेतक-यांना सातत्याने मार्गदर्शन सुरू असुन ८६०३२ सह जादा उत्पादन देणाऱ्या अन्य ऊस जातीचे बेणे पुरवठा केला जात आहे. उसाच्या रसापासुन इथेनॉल निर्मीती करून संजीवनीने देशात सर्वप्रथम धाडसी प्रयत्न केल्याचे बिपीनदादा कोल्हे म्हणाले. खासदार हेमंत गोडसे सत्कारास उत्तर देतांना म्हणाले की, ग्रामिण अर्थकारणाला सर्वोच्च प्राधान्य देत संजीवनी उद्योग समुहांने जी प्रगती केली ती सहकाराला भूषणावह असुन युवानेते विवेक कोल्हे यांच्या दुरदर्शी प्रयत्नांतुन कोल्हे कारखान्यांने पॅरासिटामॉल औषध निर्मीती प्रकल्प उभारणी करून त्यावर केलेले काम सर्वांनाच प्रेरणादायी आहे. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.

फोटोओळी:-कोपरगांव
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी संजीवनी उद्योग समुहास भेट दिली असता त्यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी शाल, श्रीफळ, साईबाबांची मुर्ती देवुन सत्कार केला. याप्रसंगी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *