आज दि.१९ सप्टेंबर २०२१ वार. रविवार देव द्या, देवपण घ्या उपक्रम:- विद्यार्थी कृती समिती अध्यक्ष आकाश पगार…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:- नाशिक दि. १८ (प्रतिनिधी) :- प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे होणारे गोदावरी नदीचे प्रदूषण रोकण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून सोशल डिस्टींक्शनचे सर्व नियम पाळत आज रविवार (दि.१९) देव द्या, देवपण घ्या उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी दिली आहे. गेल्या ११ वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम नाशिकमध्ये राबविण्यात येतो.

चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे सकाळी ८ वाजेपासून “देव द्या देवपण घ्या” या उपक्रमांतर्गत कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना सुरक्षिततेसाठी विद्याथी कृती समितीच्या वतीने मोफत कुर्ता, फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे व सॅनिटायझर देण्यात आले आहे.
गोदावरीचे प्रदूषण रोकण्यास सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवातील प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे गोदावरीत विसर्जन न करता “देव द्या देवपण घ्या” या उपक्रमांतर्गत त्या दान कराव्यात असे आवाहनही विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी केले आहे. समितीकडे आलेल्या गणेशमूर्ती मंगलमय व पवित्र वातावरणात नाशिक महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात. अधिक माहितीसाठी ९४२१५६३५५५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
चौकट:- आज दि.१९ सप्टेंबर २०२१ रोजी चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे उभारण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर सकाळी ८ वाजेपासून सोशल डिस्टक्शनसह फेस मास्क व हातमोजे वापरत देव द्या, देवपण घ्या उपक्रमाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असून याठिकाणी गणेश भक्तांना आरती करण्याची व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आकाश पगार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *