चक्क दुसर्यांदा उकीरड्यावर नगरसेवक हाजी महेमुद सय्यद यांचे गांधीनगर भागातील प्रश्ना बाबतीत उपोषण…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरातील गांधीनगर परिसरातील विविध प्रश्ना संदर्भात नगरसेवक हाजी महेमुद सय्यद यांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता.आज त्यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

सदरचे उपोषणाची दुसर्यादा वेळ असुन अद्यापही कामे झाले नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहे.या भागातील नागरिक व महिलांनी उपोषणाला पाठिंबा देत म्हणाले की,नगरसेवक महेमुद भाई सय्यद नेहमी कुठलेही काम असो ते करत असतात.प्रत्येक गल्लीत त्यांची भेट असते.प्रत्येक कामाचा पाठपुरवठा ते करत असतात. परंतु नगरपालिका आमच्या समस्या सोडविण्यासाठी उदासीन दिसत आहे.लवकरात लवकर कामे करावी अन्यथा तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *