
कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन ग्रामपंचायत कार्यालयासमोर शासनाच्या आदेशानुसार व मार्गदर्शक सुचना पाळत आकर्षक गुढी व भगवी पताका उभारून सुंदर रांगोळी सजावट करत ३४८ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला

यावेळी ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या प्रतिमेचे व गुढीचे पूजन प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिशभाऊ कानडे यांचे सह उपस्थित उपसरपंच विशाल गोर्डे, सदस्य गोकुळ कानडे, प्रशांत संत, राहुल शिंदे, प्रकाशराव गोर्डे, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे, मधुकर टेके,अशोकराव निळे,गजानन देशमुख ,सोमनाथ थोरात आदींनी पुजन करुन एका सुरात राष्ट्रगीत घेऊन मानवंदना दिली

यावेळी ईश्वरी कानडे या चिमुकलीने शिवराय साकारून सर्वांचे लक्ष वेधले यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब वाघ, सतिष गायकवाड ,संदीप आगे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
