काय हा बावळटपणा:-गोरेसर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
किती छोटी छोटी स्वप्नं असतात आपली ! महत्त्वाकांक्षा हा शब्दही पेलू नयेत अशी असंच माझं एक … तुम्ही गालातच हसाल .. असं एक गोडुले स्वप्न होतं … जेव्हा माझा पहिला पगार हाती येईल तेव्हा एक अख्खाच्या अज्या ग्लुकोजच्या बिस्किटाचा पुडा चहात बुडवून खाण्याचं स्वप्न … अख्खा पुडा हे आज हास्यास्पद वाटतं ना … कारण … पाहुण्यांनी चुकून माकून आणलेला बिस्किटाचा पुडा भावांत व घरातल्यांना वाटण्यात संपून जायचा … जेमतेम दीड बिस्किटे हाती यायचे . पण मिटक्या मारीत खायचो …. मामानं दिलेली रावळगावची गोळी नजराण्यासारखी मिरवायचो दिवाळीत मिळालेलं भुईचक्र एखादे वतन मिळाल्याचा आनंद होई … आज मुलांना सांगितलं की … सहज ते म्हणातात .. कायहा बावळटपणा … आईन केलेल्या गुळपापडीच्या ठामतीला पारखं झालेलं त्याचं बालपण कॅटबरी आणि पिज्जात व्यापलं आहे …
खरे आहे ना..!

सुलेखन – गोरे सर
9850 613 612

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *