
कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक १०/११/२१ रोजी मा.श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष, मा.रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र एस. टी कर्मचारी संघटना यांच्या विविध मागण्यासह सरकार मध्ये एस. टी महामंडळ समावून/ विलीनीकरण घेण्याबाबतचा जो संप पुकारला आहे. एस. टी कर्मचारी यांच्या विविध मागण्या शासन स्तरावर मान्य कराव्यात साध्य संप चालू आहे.
तरी या सर्व मागण्या मान्य कराव्यात त्यास वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. वेळ प्रसंगी एस. टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र भर तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.


आश्या प्रकारच्या पाठिंब्याचे निवेदन एस.टी कर्मचारी संघटना यांना देण्यात आले.या वेळी वंचित चे नेते शरद खरात, वंचित चे युवा जिल्हाअध्यक्ष प्रवीण आल्हाट यांनी एस. टी कर्मचारी संपकऱ्याना आपल्या भाषणातुन मार्गदर्शन केले तसेच या प्रसंगी पै.साईनाथ जाधव, गणेश रानशूर, आकाश दुशिंग, राकेश गायकवाड, सचिन कोपरे, संजय कोपरे, सतीश गुंजाळ, दौलत शिरसाट, संजय त्रिभुवन, राजू जाधव, ऋषिकेश त्रिभुवन, अनिल बनसोडे, विजय कासलिवाल , पुष्पक भिंगारदिवे, यश गायकवाड, सिद्धार्थ साळवे, शिवाजी जाधव, दिलीप कदम, नानाभाऊ सगट, अमोल अस्टेकर, सागर साळुंके, बबन वाघ, भीमराव शिंदे, सुनील राहणे, अरबाज शेख , प्रभाकर थोरात, अमजद शेख, प्रवीण गुंजाळ, राकेश वाघ, मोसीन मणियार , दीपक आरने यांच्या सह वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी एस. टी कर्मचाऱ्याच्या वतीने देवदत्त अंदुरे यांनी वंचीत बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले…
