शिवसेना कोपरगाव शहर व योग प्रचार संस्था आयोजित पहाड पाडवा कार्यक्रम संपन्न..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरात शिवसेना व योग प्रचार संस्था आयोजित पहाड पाडवा कार्यक्रम दि.५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला आहे.सांस्कृतिक वातावरणात भर टाकणार्या मैफलीमध्ये महत्वाचा वाटा पाडवा आहे.पाडवा म्हणजे नविन वर्षाची सुरुवात करणारा उत्सव होय.कोपरगाव शहरातही मोठ्या उत्साहाने पहाट पाडव्याला सुरुवात झाली असुन आज दि.५ नोव्हेबर रोजी रसिक प्रेक्षकांना सुमधुर संगीताची मेजवानी व आपल्या पवित्र दिवाळी सणाचा आनंद , पाडवा नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली यावेळी ब्राह्म मुहूर्तावर उठून, अभ्यंगस्नान करुन निसर्गरम्य वातावरणात, गंगा गोदावरी मातेच्या सहवासात, मनाला आनंद देणारी ओवी पासून अभंगापर्यंत, भूपाळी पासून भैरवी पर्यंत नाद संगीत विद्यालय, वारी. यांचा मराठी लोक कला, पारंपरिक गीतांचा सुमधुर कार्यक्रम ऐकत आपल्या दिनचर्येची सुरुवात करुन झाली आहे. सदरचा कार्यक्रम स्व. खा. सुर्यभान वहाडणे गोदावरी घाट.‌ योग प्रचार संस्था, कोपरगाव.या ठिकाणी संपन्न झाला आहे.सदर कार्यक्रमासाठी कलविंदर सिंग दडियाल, दत्ताजी पुंडे,युवा नेते विक्रांत झावरे,संतोष होने बाळासाहेब सांळुके,वैभव हलवाई,सतिष शिंगाणे, रोहन दरपेल,संदीप सावत्कर ,भुषण वडागळे,विकास शर्मा, सुनिल कडू, राजेंद्र शिरोडे,अमित लोहाडे, नितिन डोंगरे,आदीनाथ ढाकणे, विमललाई पुंडे अश्विनिताई होणे,राखीताई विसपुते,उमाताई वहाडणे,अर्चनाताई लाड, सर्वणा दरपेल.,लोळगे ताई ,भोसले ताई अरविंद सावजी,सुनिल भावसार . राजेंद्र भालेराव,भाऊसाहेब सांळुके यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल म्हणाले की,कोपरगाव शहरात योग प्रचार संस्था गेल्या २२ वर्षापासून कामकाज करत आहे.हे अविरतपणे २२ वर्षे कामकाज करणे बोलणे सोपे असते पण करणे अवघड असते.दत्ताजी पुंडे यांच्या योग प्रचार संस्थेच्या कार्याला सलाम करुन शुभेच्छा देवुन येथून पुढेही असेच कामकाज चालु ठेवावे.असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार त्यांनी मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *