चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे ना. आशुतोष काळेंच्या हस्ते लोकार्पण संपन्न…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरावस्था झाल्यामुळे रुग्णांना आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी येत होत्या. याची दखल घेवून श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी जिल्हा परिषदेकडून आणलेल्या ३ कोटीच्या निधीतून सर्व सुविधायुक्त असलेली व चासनळीच्या वैभवात भर घालणारी चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत रुग्णांना आरोग्यसेवा देण्यास सज्ज झाली असून नुकतेच ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते या चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे.
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील अहमदनगर-नासिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेले चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्र मागील अनेक वर्षापासून चासनळी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत होते. मात्र मागील काही वर्षात या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या झालेल्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी नवीन इमारत होणे अत्यंत गरजेचे होते. त्यासाठी २०१६-१७ मध्ये ना. आशुतोष काळे यांनी पुढाकार घेवून या इमारतीसाठी जिल्हा परिषदेकडून ३ कोटी रुपये निधी आणला होता. त्या निधीतून हि इमारत उभी राहिली आहे. जीवघेण्या कोरोनाच्या संकटात या चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राने नागरिकांच्या आरोग्याची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेवून महत्वाची भूमिका बजावली आहे. कोरोना संसर्ग तपासणीपासून ते कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लसीचा डोस नागरिकांना देण्यात महत्वाचे योगदान चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आहे. नवीन इमारत झाल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील चांगल्या आरोग्य सुविधा नागरिकांना देण्यात येतील.आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आजारपणात उपचार घेण्यासाठी ना. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राची नूतन इमारत यापुढे खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाली आहे. या नूतन इमारतीच्या लोकार्पणा बरोबरच २० लाख रुपये निधीतून किरण टिळेकर घर ते चांगदेव तिडके घर रस्ता मजबुतीकरण करणे व ८ लाख रुपये मुस्लिम कब्रस्थान संरक्षक भिंत बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन तसेच २४ लाख रुपये निधीतून कारवाडी येथे करण्यात आलेल्या प्राथमिक शाळा ते लक्ष्मण सांगळे घर रस्ता मजबुतीकरण कामाचे लोकार्पण देखील ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते यावेळी पार पडले.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक सचिन चांदगुडे, अशोकराव तिरसे, जि. प. सदस्य सुधाकर दंडवते, सुभाषराव गाडे, भास्करराव चांदगुडे, सोमनाथ चांदगुडे, वसंतराव दंडवते, विठ्ठलराव जामदार, निवृत्ती घुमरे, साहेबराव सोनवणे, डॉ. मच्छिन्द्र बर्डे, दिलीपराव चांदगुडे, सरपंच निळकंठ चांदगुडे, पंडितराव चांदगुडे, रणजित बोरावके, प्रभाकर चांदगुडे, महेश आहेर, कैलास आहेर, अशोक मोरे, रवींद्र आहेर, शंकरराव गावंड, सोमनाथ घुमरे, वेणुनाथ घुमरे, निवृत्ती घुमरे, जनार्दन गावंड, भास्करराव तिरसे, संदीप जाधव, सुनील गाडे, अण्णासाहेब चांदगुडे, दादासाहेब गावंड, दिगंबर चांदगुडे, कैलास माळी, बाळासाहेब ठाकरे, विकास चांदगुडे, गणेश घुमरे, प्रकाश आहेर, चांगदेव तिडके, अनवर सय्यद, लतीफ सय्यद, युसूफ सय्यद, इस्लाम सय्यद, अकबर सय्यद, रफीकभाई पठाण, मुसा शेख, नरेंद्र कोकाटे, दत्तात्रय आढाव, सरपंच रुपाली माळी, सुमित ताम्हाणे, रमेश ताम्हाणे, अशोक जोशी, पोपट गांगुर्डे, नवनाथ मोरे, साईनाथ कोकाटे, प्रविण जाधव, किसन सोनवणे, अशोकराव गडाख, विनायक पवार, जनार्दन शिंदे, सचिन क्षिरसागर, विजय आहेर, निवृत्ती मोहिते, शिवराम भारती, अनिल जाधव, राहुल जगधने, वेणूनाथ घुमरे, श्रीकांत तिरसे, शिवाजीराव तिरसे, सुरेश गावंड, दादासाहेब पायमोडे, विजय झगडे, अनिल माळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ:- चासनळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण प्रसंगी ना. आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *