जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावाला न्याय दिला:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- पाच वर्षापूर्वी कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने इतिहास घडवत जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता दिली. या पाच वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शाळा खोल्या, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण भागाला जोडणारे अनेक रस्ते, साठवण बंधारे बांधले जावून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली व व्यक्तिगत लाभाच्या योजना देखील प्रभावीपणे राबविल्या गेल्या. येत्या काही दिवसांनी जिल्हा परिषद पंचायत समितीचा कार्यकाळ संपणार आहे मात्र अजूनही अनेक विकास कामांचे भूमिपूजन होणे बाकी आहे. यावरून किती विकासकामे झाली याचा अंदाज येत असून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावाला न्याय दिला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

                        कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे २१ लक्ष निधीतून बांधण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकामाचे व १० लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या गोधेगाव-शिरसगाव रस्ता ते साळुंके वस्ती शिवरस्ता खडीकरण कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

         पुढे बोलतांना ते म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून मागील पाच  वर्षात झालेला विकास यापूर्वी कधीही झाला नाही. नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्यामुळे सूज्ञ मतदारांनी त्याची पुनरावृत्ती विधानसभेला केली आहे. मा. आ. अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना विकासकामे करून दाखविली. मी तर सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे तुमच्या विकासाच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणार आहे. जीवघेण्या कोरोनाच्या महामारीत देखील मतदार संघाच्या विकासाला निधी कमी पडू दिला नाही व यापुढेही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत विकासाचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी सभापती सौ.पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कारभारी आगवण,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक बाळासाहेब बाराहाते, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, दिलीप दाणे, प्रकाश शिंदे, सरपंच अशोक भोकरे, उपसरपंच अश्विनी कोळसे,अशोक उकिरडे, भाऊसाहेब भोकरे, रावसाहेब भोकरे, नंदकुमार रांधवणे, ज्ञानेश्वर पठाडे, अनिल शिरसाठ, गणेश दाणे, जगन बागल, पोपट भुजाडे,प्रवीण चौधरी, दिनकर भुजाडे, विठ्ठल हुसळे, सुभाष रांधवणे, नितीन कानडे, अशोक बोरकर, उत्तम सोळसे, विजय कदम, सारंगधर साळुंके, बाळासाहेब शिंदे, गणपत भोकरे, वाल्मिक पठाडे, पोपट साळुंके, रंजन साळुंके, राजेंद्र माने, रमेश बारहाते, सुदाम माने, बाबासाहेब जगताप, पुंजाहरी भोकरे, सचिन क्षीरसागर,पंडित सोळसे, साहेबराव भोकरे, शिवदास कोळसे, सहादू गायकवाड, नामदेव वाघमारे, मल्हारी सोळसे, भाऊसाहेब भुजाडे, राजेंद्र भुजाडे, बापू भुजाडे, अमृत शिंदे, दत्तू सोळसे, राजेंद्र हुसळे, राकेश रांधवणे, जनार्दन शिंदे,किशोर साळुंके, राहुल गोरे, पवन सोळसे,राजेंद्र शिंदे, वाल्मिक पठाडे, निलेश दिघे,दिलीप आबक, संजय काळे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी पंचायत समिती अभियंता उत्तमराव पवार, शाखा अभियंता लाटे, ग्रामसेविका तृप्ती जगताप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ – गोधेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम व गोधेगाव-शिरसगाव रस्ता ते साळुंके वस्ती शिवरस्ता खडीकरण कामाचे भूमिपूजन प्रसंगी आमदार आशुतोष काळे व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *