
विसपुते सराफ पेढीच्या पहिल्या महापैठणीच्या मानकरी ठरल्या वर्षा सदाफळ…

कोपरगांव प्रतिनिधी:-
कुपनने गच्च भरलेला बॉक्स,उपस्थित ग्राहक – कर्मचारी यांच्या चेहऱ्यावरचे उत्सुकतेचे भाव, अभिनेत्री विद्या करंजीकर यांचा प्रसन्न वावर आणि सर्वांच्या नजरा खिळलेली प्रमुख पाहुण्यांच्या खुर्चीत विराजमान झालेली रु. एक लाख किमतीची महापैठणी ….विसपुते सराफी पेढीवर अशा उत्सुकतेने भारलेल्या कार्यक्रमात विजेत्या म्हणून वर्षा प्रमोद सदाफळ यांच्या नावाची घोषणा होताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.लग्नसराईनिमित्त विसपुते सराफी पेढीच्या विवाह अलंकार – बस्ता फेस्टिवल या योजनेतील रु. एक लाख किमतीच्या पहिल्या पैठणीचा बक्षिस समारंभ अभिनेत्री विद्या करंजीकर यांच्या हस्ते पार पडला.येत्या 15 मार्चपर्यंत चालणाऱ्या या योजनेला पहिल्या टप्प्यात पंचक्रोशीतून ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यातूनच मकर संक्रांतीच्या दिवशी रु. 1 लाख किमतीच्या पहिल्या पैठणीचा बक्षीस समारंभ झाला, त्यात वर्षा प्रमोद सदाफळ या पहिल्या महापैठणीच्या मानकरी ठरल्या. ” दागिने आणि पैठणी हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. प्रत्येकीच्या मनात खोल रुजलेली ही दोन्ही स्वप्ने एकाचवेळी प्रत्यक्षात आणणारे विसपुते सराफ यांचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि एक लाख रुपये किंमतीच्या पैठणीचे विजेते जाहीर करणं हा माझ्या आयुष्यातला तितकाच मौल्यवान क्षण आहे आणि तो कायम स्मरणात राहील ” अशा शब्दांत अभिनेत्री विद्या करंजीकर यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.


कापसे पैठणीचे संचालक दिलीप खोकले यांनी या महा पैठणीचे वैशिष्ट्य उलगडून दाखवले. या कार्यक्रमाचे स्वागत- प्रास्ताविक पेढीचे युवा संचालक यश विसपुते यांनी केले.सौ.पूनम विसपुते यांनी अभिनेत्री विद्या करंजीकर यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर कापसे पैठणीचे संचालक श्री. दिलीप खोकले यांचा सत्कार पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी केला. कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन आनंद क्षेमकल्याणी यांनी केले तर प्रदीप दुसाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
