
कोपरगाव प्रतिनिधी:-
देवळाली प्रवरा नगरपरिषच्या मुख्याधिकारी पदाचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या IAS नेहा भोसले मॅडम यांचे देवळाली हेल्प टीमचे वतीने वृक्ष भेट देऊन स्वागत करणेत आले व देवळाली प्रवरा नगरपरिषद परिपुर्ण करण्याचे दृष्टीने निवेदनाद्वारे साकडे घालनेत आले.



या प्रसंगी हेल्प टीमचे वतीने माजी सनदी अधिकारी दत्तात्रय कडू पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, सागर सोनवणे, ऋषिकेश संसारे, शंकर धोत्रे आदी कोअर कमिटी सदस्य हजर होते. प्रसंगी रजेवर असलेले मुख्याधिकारी अजित निकत हे सुद्धा हजर होते.
देवळाली प्रवरा हेल्प टीमचे वतीने देणेत आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मा. भोसले मॅडम आपले देवळाली प्रवरा नगरीत देवळाली प्रवरा हेल्प टीमच्या वतीने मनःपुर्वक स्वागत. आपण आपल्या प्रशासकिय सेवेची सुरवात आमचे नगररिषदेपासुन करत आहात. तसेच एक सनदी अधिकारी आमचे नगरपरिषदेस लाभला याचा आम्हांस आनंद आहे.
देवळाली प्रवरा राज्यात प्रथम क्रमांकाची नगरपालीका म्हणुन जरी नावलौकिक असला तरी नगरपरिषद हि सर्वार्थाने परिपुर्ण नसल्याचे वास्तव नाकारतां येणार नाही. नगरपरिषदेचे मुळ कर्तव्ये आरोग्य, स्वंच्छता, पाणीपुरवठा तसेच प्राथमीक शिक्षण हि आहेत. आपण जर पाहिलेत तर यात आरोग्य व प्राथमीक शिक्षण ह्या दोन मुलभुत बाबी अद्यापहि नगरपरिषदेने ताब्यात घेतलेल्या नाहीत. नगरपालीका स्थापन होवुन जवळपास काही दशके लोटली परंतु या गोष्टींवर कुणीहि काम केले नाही. आर्थिक परिस्थिती यांस कारणीभुत सांगितली जाते. महोदया जर नगरपरिषदेचे हि मुलभुत दोन कर्तेव्ये जर पार पाडली जात नसतील त्यातुन नागरिकांस दर्जेदार आरोग्यसेवा व मुलांना कसदार प्राथमीक शिक्षण मिळत नसेल तर काय उपयोग.कोरोनाचे दुस-या लाटेत फार भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. जवळपास १००० लोक संसंर्गीत झाले तसेच ६० मृत्युमुखी पडले. या शहरात एकही एमबीबीएस तसेच तज्ञ डॅाक्टर नाही. नगरपालिकेचे रुग्णालय नाही. अश्यावेळी नागरिंकांची होत असलेली परवड खुप विदारक होते. दर्जेदार शिक्षणाचे महत्व आपण जाणतां,प्राथमीक शिक्षण नगरपरिषदेने ताब्यात घेतले तर मुलांचा पाया पक्का होईल. जिल्हापरिषदेकडिल या दोन्ही सेवा नगरपरिषदेकडे हस्तांतरित करुन घेवुन नगरपरिषद परिपुर्ण करणेबाबत आपल्यासारख्या उच्च विद्याविभुषीत सनदी अधिका-याने लक्ष द्यावे हि अपेक्षा आहे.
या शहराची ७०% लोकसंख्या हि शेतावर वाड्या वस्त्यांवर रहाते. त्यांचा स्वच्छता हा विषय त्यांचा ते हाताळत असतात.नगरपरिषद केवळ ३०% टक्के लोकसंख्येस हि सुविधा देत आहेत, स्वच्छेसाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभुत सुविधा नगरपरिषदेकडे आहेत. केवळ थोडेफार मनुष्यबळ कमी पडते. ते कंत्राटीपध्दतीने उपलब्ध करुन घेतल्यास यावर होणा-या खर्चात १ करोड रुपयाची बचत होवु शकते. त्यातुन आरोग्य न् प्राथमीक शिक्षण या सुविधा देता येतील.
या शहरात मागासवर्गीय व आदिवासी समाजाची संख्या लक्षणीय आहे. नगरपरिषद झाल्याने या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या वैयक्कीक लाभाच्या योजनांपासुन वंचीत रहावे लागत आहे. त्यासाठी नगरपरिषद स्तरावर या घटकांसाठी विशेष घटक योजना तयार करुन त्यांस नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकात अनिवार्य तरतुद करुन वैयक्तीक लाभाच्या योजना राबवाव्यात हि विनंती.
या गावातील युवती व महिला यांचे शिक्षण, आरोग्य रोजगार हे अंत्यत दुर्लक्षित विषय आहेत. या घटकांसाठी आपण एक कालबध्द व नियोजनबध्द कार्यक्रम आखावा. या शहरातील ८० ते ९० टक्के महिलांचा हिमोग्वोबिन स्तर आवश्यकतेपेक्षा खुपच कमी आहे. हि खुप चिंताजनक बाब आहे. आपण या घटकाच्या मार्गदर्शक व आदर्श बनुन यांचे मुलभुत प्रश्न सोडविण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करण्याची विनंती आहे.
महोदया देवळाली प्रवरा हेल्प टीम हि कोरोनाचे दुस-या लाटेत तयार झालेली टीम असुन यात उच्चशिक्षित व्यक्ती असुन निरपेक्ष भावनेने ते काम करत आहेत. देवळाली प्रवरा येथे क्रिडासंकुल तसेच ग्रामीण रुग्णालय उभारणेबाबत शासकिय जागा उपलब्ध करुन घेणेबाबत आम्ही पाठपुरावा सुरु केला आहे. आपणहि त्यात लक्ष द्यावे. केवळ एका निरपेक्ष भावनेने आपणांस वरिल मागण्या केल्या आहेत. त्या आपण मार्गी लावाल अशी अपेक्षा आहे.
आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी आभार व्यक्त केले.
