
अहमदनगर जिल्हा कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या विनंतीस मान देऊन राहुरी तालुक्यातील कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी महिला व बाल विकास विभागाचे वतीने राहुरीत शिबिर आयोजित केले बद्दल व तालुक्यातील १३४ बालकांना बाल संगोपन योजना मंजूर केल्या बद्दल जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष मा. हनिफ शेख सर व समस्त टीमचे कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे वतीने हार्दिक आभार.
आजच्या शिबिराची माहिती मिळू शकली नाही असे व ज्यांचे कागदपत्र पूर्तता होऊ शकली नाही अश्या तालुक्यातील उर्वरित बालकांसाठी पुन्हा राहुरीमध्ये शिबीर आयोजित करण्याबाबत जिल्हा बाल कल्याण समितीला कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका समन्वयक आप्पासाहेब भिमराज ढुस व प्रशांत सुधाकर कराळे यांनी लेखी पत्र देऊन मागणी केली आहे.
