

कोपरगाव प्रतिनिधी:- जेष्ठ नागरिक सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष कै भागचंदभाऊ ठोळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ना नफा ना तोटा तत्त्वावर उत्कृष्ट दर्जाचे दिपावली फराळ विक्री परंपरा आजतागायत सुरू ठेवली आहे कै दगडू महाराज उपाध्ये यांचे परिवाराने जेष्ठ नागरिक सेवा मंच जेष्ठ महिला समितीचे वतीने सर्वांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून दिले आहे राजू / शामू/ आनंद महाराज आणि परिवाराने कै दगडू महाराज उपाध्ये यांचे स्मरणार्थ दरवर्षी दिपावली फराळ विक्री केली जाते
यंदा कोरोनाचे सावट थोडेफार कमी झाल्याने गोरगरीब जनतेला आनंद साजरा करण्यासाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर दिपावली फराळ विक्री शुभारंभ करण्यात आला सनदि लेखापाल एस एल कुलकर्णी डॉ संकेत मुळे सतीश गुजराथी युसुफ रंगरेज सी आर बजाज सर कासलीवाल सर योगेश जोबनपुत्रा सौ उमाताई वहाडणे सौ जोबनपुत्रा याचे उपस्थित फराळ विक्री शुभारंभ करण्यात आला
कै दगडू महाराज उपाध्ये यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले स्वागत प्रास्ताविक विजय बंब यांनी केले डॉ संकेत मुळे यांनी मनोगत व्यक्त केले त्या वेळी ते म्हणाले की कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले होते अनेक कुटुंबांना संकटाचा सामना करावा लागला अशी वेळ कधी कुणाला येऊ नये आता काळजी घेणे आवश्यक आहे जेष्ठ नागरिक सेवा मंचचा उपक्रम कौतुकास्पद आहे
जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने जनतेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या ऐन दिवाळीत सेवा देणाऱ्या पोलिस ठाण्यात एस टी तील रेल्वे स्टेशन कर्मचारी आदि ठिकाणी दिपावली फराळ भेट दिला जातो
या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत
समारंभ प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते उत्तम भाई शहा यांनी आभारप्रदर्शन केले
