श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात पत्रकार दिन उत्साहात संपन्न झाला:- मकरंद कोर्हाळकर…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव:– कोपरगाव मधील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात बाळशास्त्री जांभेकर जन्म दिन, राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पत्रकार बांधव व मान्यवरांच्या हस्ते गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्यांस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी सर्व पत्रकारांच्यावतीने जेष्ठ पत्रकार नानासाहेब जवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की, पत्रकार म्हणजे दर्पण (आरसा) असतो पत्रकाराला जे दिसत ते तो लिहित असतो. बाळशास्त्री जांभेकर यांचे समाजकार्य त्यांचा संपूर्ण जीवनपट त्यांनी यावेळी उलगडून सांगितला. पुढे त्यांनी पत्रकारितेतील समस्या, त्रास, याबद्दल सांगितले. , त्यांना पत्रकारितेमध्ये आलेले कडू गोड अनुभव तसेच जुनी आणि सध्याची पत्रकारिता यातील फरक त्यांनी या निमित्ताने सर्वाना सांगितला.

तसेच पुढे कोपरगांव एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष व प्रसिध्द उद्योजक कैलास ठोळे म्हणाले की,
कोपरगांवच्या विकासात पत्रकाराचे मोलाचे योगदान असून पत्रकारीतेत परिवर्तन घडविण्याची ताकद आहे.कोपरगावचा विकास करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असून कोपरगांवच्या विविध प्रश्नाबाबत सर्व पत्रकाराची बैठक घेणार असल्याचे ते यावेळी बोलले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे होते.यावेळी उपस्थितांचे स्वागत रवि पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले;तर कोपरगांव एज्युकेशन सोसायटी सचिव दीलीप अजमेरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दरम्यान यावेळी सर्व पत्रकारांचा विदयालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.डी.गोरे यांनी केले, तर आभार विदयालयाचे जेष्ठ शिक्षक रमेश गायकवाड यांनी मानले

या वेळी कार्यक्रमाला प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे सर्व प्रतिनिधी,सर्व पत्रकार बांधव तसेच विद्यालयाचे
सहसचिव सचिन अजमेरे,तुपसैदर डी.व्ही.आव्हाड व्ही.एम,जाधव ई.एल,कुळधरण बी.बी,निलेश बडजाते,अनिल काले,बलभिम उल्हारे,योगेश गवळे,सौ.पुरी एस.व्ही,बोरावके आर.आर,महानुभाव के.एच आदि शिक्षक उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *