कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योगसमूहाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार सन्मान सोहळा आज पार पडला…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योगसमूहाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार सन्मान सोहळा आज माजी आमदार मा.श्री. अशोकदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे व दैनिक लोकसत्ताचे सहयोगी संपादक मा.श्री. मुकुंद संगोराम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी पत्रकारांनी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी पत्रकारांचे आभार मानले. तसेच मा.श्री. मुकुंद संगोराम यांनी बदलत्या काळाबरोबर पत्रकारितेत होत असलेल्या बदलांबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, सुनील शिंदे, काकासाहेव जावळे, सचिन चांदगुडे, राजेंद्र मेहेरखांब, अशोक तिरसे, कोपरगाव मतदारसंघातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मेडियाचे सर्व पत्रकार, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *