कोपरगाव काँग्रेस तर्फे संवाद मेळावा व हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव काँग्रेस कमिटी तर्फे शनिवारी काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळावा तसेच महिला काँग्रेस तर्फे हळदी कुंकू समारंभाचे यशस्वी आयोजन श्रीगोंद्याचे नेते सहकारमहर्षी शिवाजी बापू नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे,जिल्हा काँग्रेस कमिटीचे समनव्यक ज्ञानदेव वाफारे,काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग झावरे,संगमनेर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गणपतराव सांगळे,जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष तुषार पोटे,कोपरगाव काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,शहराध्यक्ष सुनील साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला,कोपरगाव काँग्रेसची आगामी रणनीती यावेळी ठरवण्यात आली असून तालुकाभर काँग्रेसचा प्रसार व्हावा यासाठी राजेंद्र नागवडे यांनी आग्रही भूमिका घेतली,कोपरगाव तालुक्यातील कॉंग्रेसने कात टाकली असून सर्व सेल च्या नियुक्त्या यशस्वी झाल्याबद्दल तब्बल 50 हुन अधिक पदाधिकारी कोपरगाव काँग्रेस कमिटी मध्ये कार्यरत असल्याने जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी समाधान व्यक्त केले,युवक काँग्रेस उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी तालुक्यातील काँग्रेस वाढविण्यासाठी येणाऱ्या अडचणी वारिष्ठां समोर मांडून प्रास्ताविक केले,तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी गत वर्षीचा कार्य अहवाल मांडला,शहराध्यक्ष सुनील साळुंके यांनी शहरभर कॉंग्रेसची मोट बांधणार असल्याचे स्पष्ट केले,महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा ऍड.शितलताई देशमुख व महिला शहराध्यक्षा रेखाताई जगताप यांनी महिलांचे बलाढ्य शक्तिप्रदर्शन करीत महिला काँगेसची जम्बो कार्यकारीनी प्रसिद्ध केली व हळदी कुंकू समारंभाचे यशस्वी आयोजन यावेळी करण्यात आले,

यावेळी अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष अब्बासभाई सय्यद,तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय जाधव,विष्णुपंत पाडेकर,ज्ञानेश्वर भगत,सचिव राहुल गवळी,शहर काँग्रेस सचिव लक्ष्मण फुलकर,अनुसूचित जाती विभागाचे जिखा सचिव यादवराव त्रिभुवन,अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बागुल,शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय आंग्रे,तालुका युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सागर बारहाते,विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष आशपाक सय्यद,सोशल मीडिया विधानसभा प्रमुख दादा आवारे,निरंजन कुडेकर,हृषीकेश पगारे,कृष्णा कडलग,दत्ता भागीले तसेच तालुका व शहरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *