कोपरगावात शिवसेनाप्रमुखांची ९५ वी जयंती उत्साहात साजरा…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुखांना व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त कोपरगाव रिक्षा स्टँड येथे नेत्रदीपक फुलांची आरास करून अभिवादन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी केलेले व विजयी झालेल्या शिवसैनिकांचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले व सर्व शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे स्फूर्तीचा जिवंत झरा,लाखो शिवसैनिकांचे दैवत, या प्रखर शिवतेजाने मराठी माणसाच्या मनगटात आत्मविश्वासाचा वन्ही चेतवला. स्वाभिमानाची उर्मी जागवली, मनामनात हिंदुत्वाचा अंगार फुलवला. शिवसेनाप्रमुख म्हणजे देव, देश आणि हिंदुत्वरक्षणाचे “सरसेनापती” असे जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे म्हणाले. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी व मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी झपाटून काम करा असा मंत्र शिवसेनाप्रमुखांनी दिला होता व हाच मंत्र घेऊन कोपरगाव शहर शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत राहणार असल्याचे शहरप्रमुख कलविंदरस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *