

कोपरगाव प्रतिनिधी:- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ कार्यक्रमात आज जिजाऊ महिला मंडळ व माहेश्वरी महिला मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. तसेच प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते उत्तरपूजा करण्यात आली.

आज विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या नवदुर्गांचा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये आंतरराष्ट्रीय खुल्या जलतरण स्पर्धेत ३ सुवर्णपदक मिळवून देशाची शान वाढवनाऱ्या डॉ. सुषमाताई आचारी, संजीवनी ब्लड बँकेच्या नीताताई पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी पुजाताई रक्ताटे, आशा सेविका मंगलताई गवळी, आंगणवाडी सेविका लताताई रणशूर, खादी ग्रामोद्योग हातमाग केंद्र चालवणाऱ्या अरुणाताई लोहाडे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी नगरसेविका वर्षाताई गंगूले, स्वप्नजाताई वाबळे, जयश्रीताई बोरावके, सीमाताई पानगव्हाणे, डॉ. मंजुषाताई गायकवाड, किरणताई डागा, सुजाताताई मुंदडा, निशाताई गवारे, रश्मीताई कडू, वर्षाताई कापसे, पुजाताई देशमुख, डॉ. दीपालीताई आचारी, आरतीताई शिंदे, रुपालीताई भोकरे, वंदनाताई चिकटे आदी उपस्थित होत्या.
