सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या संगणकीय विभागाचे प्रमुख रमाकांत मोरे यांचे निधन…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या संगणकीय विभागाचे प्रमुख, नाटेगांवचे प्रगतशिल शेतकरी रमाकांत बाबूराव मोरे (६०) यांचे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संगणकीय कामकाजाचा आत्मा हरपला अशा शब्दात अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी शोक व्यक्त केला तर भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे विश्वस्त अमित कोल्हे, तज्ञ संचालक विवेक कोल्हे, सर्व आजी माजी संचालक आदिनी श्रध्दांजली वाहिली त्यांच्या पार्थिवावर नाटेगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.
कै. रमाकांत मोरे यांना माजीमंत्री शंकरराव कोल्हे व तत्कालीन कार्यकारी संचालक स्व. व्ही. पी. नायडु यांनी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट संस्थेत शुगर टेक व संगणकीय ज्ञानाच्या कोर्ससाठी पाठविले होते त्याचे त्यांनी चीज करून दाखवत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांच्या संगणकीय कामकाजाची दैनंदिन घडी बसविण्यांत त्यांचा सिहांचा वाटा होता. संगणक तंत्रज्ञान प्रोग्रॅम मध्ये ते चाणाक्ष होते. राज्यातील सहकारी साखर कारखानदारीतील अत्यंत सोप्या संगणकीय सॉफटवेअरच्या निर्मीतीचा पाया त्यांनी कोल्हे कारखान्यांत घातला आणि त्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट मार्फत राज्याच्या साखर कारखानदारीला हे तंत्रज्ञान अवगत झाले. सॉफटवेअर दोषावर ते रात्र-रात्र अभ्यास करून त्यावर उपाययोजना करत. महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अमृतमहोत्सवी समारंभात सहकार शताब्दीबाबत व्याख्यान सादरीकरणांत त्यांनी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांना वयाच्या ८१ व्या वर्षी संगणक लॅपटॉप हाताळण्याच्या कलेबरोबरच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पडद्यावर कसे सादर करावयाचे याबाबतही ज्ञान दिले होते. सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांच्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन झेंडावंदनच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. नेहमी हसतमुख, स्वत:च्या चाणाक्ष बुध्दीचा कधीही गर्व नाही, वयाने छोटे-मोठे कुणीही असो सर्वाशी ते नम्रतेनेच बोलणार, त्यांच्या अकाली जाण्याने संजीवनी परिवार पोरका झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *