आ. आशुतोष काळे सामाजिक बांधिलकी जोपासणारेसंवेदनशील लोकप्रतिनिधी:-सौ. पुष्पाताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत विकासाच्या अपेक्षा पूर्ण करून विकासाबरोबरच आपली सामाजिक बांधिलकी जोपासनारे आ. आशुतोष काळे संवेदनशील लोकप्रतिनिधी असल्याचे प्रतिपादन गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे यांनी केले आहे. दिव्यांग बांधवांना आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून मिळवून देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांचे गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई […]

Read More

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-सामाजिक न्यायाचे प्रणेते, राजर्षी, छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि.२६ जुन रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक मंदारजी पहाडे, हाजी मेहमूदभाई सय्यद, दिनकरजी खरे, गौतम सहकारी बँकेचे माजी संचालक सुनीलजी शिलेदार, अशोकजी आव्हाटे, ऋषीकेशजी खैरनार, मनोजजी कडू, किरणजी बागुल, विजयजी नागरे, हर्षलजी जैस्वाल, मनोजजी नरोडे, […]

Read More

सामाजिक न्याय दिन महत्त्व व इतिहास; सामाजिक न्याया’ चा पुरस्कर्ता राजर्षी छत्रपती शाहू महाराज:- जि.मा.का.सुरेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-‘26 जून’ छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस. राज्यात सर्वत्र ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या दिवसाचे महत्त्व काय आहे ? राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचे कोणते कार्य व सुधारणा केल्या ज्यामुळे आजच्या त्यांच्या जन्मदिनी राज्यात सर्वत्र ‘सामाजिक न्याय दिन’ साजरा करण्यात येतो. हे आपण या लेखात वाचणार आहोत.राजर्षी शाहू महाराज […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सहा अभियंत्यांची मॅन्डेल व इपिटोम कंपनीत नोकऱ्यांसाठी निवड…

कोपरगांव प्रतिनीधी:-संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीतुन नवोदित अभियंत्यांना त्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच नोकऱ्या मिळत असुन अलिकडेच मॅन्डेलबल्ब टेक्नॉलाजिज व इपिटोम प्रा. लि. कंपन्यांनी सहा नवोदित अभियंत्यांना कॅॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत मुलाखती घेवुन नोकरीचे नेमणुक पत्र दिले आहे, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अधिकृत सुत्रांनी दिली.मॅन्डेलबल्ब टेक्नालॉजिज या आर्टिफिशिल इंटिलिजन्स, क्लाउड मायग्रेशन, […]

Read More

नगर-मनमाड महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी दूर करा; स्नेहलताताई कोल्हे यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:- सध्या नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे काम चालू असून, या कामामुळे कोपरगावनजीक पुणतांबा चौफुली येथे सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे खूपच हाल होत आहेत. कोपरगावच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे या सोमवारी दुपारी कोपरगावहून शिर्डीकडे जात असताना त्यांना पुणतांबा चौफुली येथे ट्रॅफिक जाम झाल्याचे पहावयास मिळाले. नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे […]

Read More

गौतम सहकारी बँकेच्या तज्ञ संचालकपदी, सी.ए.दत्तात्रय खेमनर, अॅड. मासूम सय्यद यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – सहकारी बँकींग क्षेत्रात अग्रगण्य असणा-या कोपरगाव तालुक्यातील गौतम सहकारी बँकेच्या तज्ञ संचालकपदी प्रसिद्ध चार्टड अकौंटंट दत्तात्रय बाळाजी खेमनर व अॅड. मासूम (मुन्ना) उमर सय्यद यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.गौतम सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाची मासिक सभा नुकतीच गौतम बँकेच्या सभागृहात पार पडली. या मासिक सभेत २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक […]

Read More

माजी आमदार अशोकराव काळेंच्या हस्ते माहेगाव देशमुखमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. यामध्ये माहेगाव देशमुख येथे २५ लक्ष रुपये निधीतून प्रजिमा ८५ डॉ. कोपरे घर ते विजयराव कदम वस्ती रस्ता खडीकरण करणे आणि कब्रस्तानला संरक्षक भिंत बांधणे आदी […]

Read More

ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे कोपरगावकर यांचे पुनवर्सन !मुख्यमंत्री, पालकमंत्री , सांस्कृतिक मंत्र्यांकडून प्रशासनाला मदतीच्या सूचना,जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून शांताबाईंची भेट घेऊन विचारपूस….

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे – कोपरगावकर यांची आज द्वारकामाई वृध्दाश्रम येथे भेट घेत ‍विचारपूस केली. वृध्द कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्या वतीने योग्य तो सन्मान राखत शासकीय योजनांचा लाभ त्यांना […]

Read More

काकडी येथे न्यू इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा वेश धारण करून येणाऱ्या आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने गावात दिंडी काढली…

कोपरगाव प्रतिनिधी:-आषाढी वारी दिंडी सोहळाकाकडी (विमानतळ) गावांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा वेश धारण करून येणाऱ्या आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने गावात दिंडी काढली,,,या दिंडीत भजनी मंडळ, ग्रामस्थ यांनी भजन म्हणत आनंद लुटला.या सुंदर कार्यक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व सन्माननीय शिक्षक वृंदांचे अभिनंदन.राम कृष्ण हरी.

Read More

संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्तराज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन, कवी-कवयित्रींनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन:-श्री.मुकुंद मामा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- संतशिरोमणी सावता महाराज यांच्या ७२८ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाने राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे.प्रथम क्रमांक- ₹३००१, द्वितीय क्रमांक- ₹२००१ , तृतीय क्रमांक- ₹१००१ व सन्मानपत्र तसेच २ उत्तेजनार्थ पारितोषिक- प्रत्येकी ₹५०१ व सन्मानपत्र तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा नि:शुल्क असून […]

Read More