
कोपरगाव प्रतिनिधी:- संतशिरोमणी सावता महाराज यांच्या ७२८ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाने राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
प्रथम क्रमांक- ₹३००१, द्वितीय क्रमांक- ₹२००१ , तृतीय क्रमांक- ₹१००१ व सन्मानपत्र तसेच २ उत्तेजनार्थ पारितोषिक- प्रत्येकी ₹५०१ व सन्मानपत्र तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा नि:शुल्क असून ‘संत सावता महाराज’ या विषयावरील स्वरचित कविता दिनांक १० जुलै २०२३ पर्यंत १)श्री. संदिप वाघोले –
swaghole137@gmail. com
९८६०७७७४२२ , २)श्री विशाल रघुनाथ गडगे, प्रदेश उपाध्यक्ष श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य vishalrgadge928@gmail.com ९७६३७१२३०१ या क्रमांकावर पाठवाव्यात तसेच राज्यस्तरीय संतशिरोमणी सावता महाराज काव्यलेखन स्पर्धेचे पारितोषिक रोख रक्कम व सन्मानपत्र वितरण १६ जुलै २०२३ रोजी होईल अशी माहिती संयोजक श्री संत सावता माळी युवक संघ अहमदनगर जिल्हाध्यक्ष मुकुंदमामा किशोर काळे यांनी दिली आहे.
