कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत विकासाच्या अपेक्षा पूर्ण करून विकासाबरोबरच आपली सामाजिक बांधिलकी जोपासनारे आ. आशुतोष काळे संवेदनशील लोकप्रतिनिधी असल्याचे प्रतिपादन गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे यांनी केले आहे.
दिव्यांग बांधवांना आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून मिळवून देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांचे गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्या म्हणाल्या की, कोपरगाव मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी सोडविले असून समाजातील अडचणीत असलेल्या घटकांच्या वेदनांची जाणीव ठेवून दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्वाचे असणारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी घेतलेला पुढाकार व केलेले सहकार्य अभिमानास्पद आहे. समाजाच्या अडचणींची जाणीव असणारे व वंचित घटकांसाठी काम करण्याची त्यांची प्रबळ इच्छा संवेदनशील लोकप्रतिनिधीचे प्रतिक असल्याचे सौ. पुष्पाताई काळे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, फकिर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, संदीप कपिले, राजेंद्र जोशी, इम्तियाज अत्तार, राजेंद्र आभाळे, भाऊसाहेब भाबड, एकनाथ गंगूले, हर्षल जैस्वाल, विजय नागरे, यादव त्रिभुवन, रोहित चव्हाण, योगेश गंगवाल आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

फोटो ओळ:- दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप करतांना सौ. पुष्पाताई काळे.
