अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्यचा प्रचार शुभारंभ संकल्प पॅनल विजयी होणारच:- संकल्प पॅनल प्रमुख रोहित मारुती वाघ…

कोपरगाव प्रतिनिधी:-अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य पुरस्कृत संकल्प पॅनलच्या माध्यमातून शिर्डी च्या पावन भूमीत प्रचार शुभारंभदिनांक 6- 3 -2021 या दिवशी साईबाबा चे दर्शन घेऊन संकल्प पॅनलच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात करण्यात आली सर्व उपस्थित पदाधिकारी यांच्यामार्फत साईबाबाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सन्मानित सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळेस उपस्थित पॅनल प्रमुख व उमेदवार […]

Read More

माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सामाजिक कार्याचा ठेवा खूप मोठा असून त्यातून त्यांनी अहमदनगर जिल्ह्याची ओळख राज्यात निर्माण केली:- ममता पिपाडा व डॉ. राजेंद्र पिपाडा…

कोपरगांव प्रतिनिधी:-माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सामाजिक कार्याचा ठेवा खूप मोठा असून त्यातून त्यांनी अहमदनगर जिल्ह्याची ओळख राज्यात निर्माण केली, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान साईबाबा शिर्डीचे तत्कालीन उपाध्यक्ष म्हणून त्यांनी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली अशा शब्दात राहाता नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा व डॉ. राजेन्द् पिपाडा यांनी श्रद्धांजली […]

Read More

अहमदनगर नाशिकसह मराठवाडयाच्या पाण्यासाठी बाजू मांडणारे कोल्हे काळाच्या पडद्याआड:- खासदार हेमंत गोडसे…

कोपरगांव प्रतिनिधी:-उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे असुन त्यात पाण्याची समृध्दी झाल्याशिवाय त्याचे वाटप होवुच शकत नाही, वाढत्या नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे तुटीच्याच पाण्याचे वाटप होत आहे हे बरोबर नाही अशी भूमिका स्वतःच्या शासनाविरूध्द मांडून त्यासाठी रस्त्यावर येवुन भांडणारे, अहमदनगर नाशिकसह मराठवाडयाच्या पाण्यासाठी वयाची ९३ वर्षे पूर्ण झाली तरी संघर्ष करणारे जलभगिरथ शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने शेती […]

Read More

जेऊर कुंभारी येथे महिला व ग्रामस्थांची गीता पठण करत माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना श्रद्धांजली…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यात वेगवेगळे उपक्रम घेऊन माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे, जेऊर कुंभारी येथे सरपंच सुवर्णा पवार यांच्या पुढाकारातून पवार वस्ती येथे महिला व ग्रामस्थांनी एकत्र भगवत गीतेचे पठण केले.पुरोहीत गणेश गुरू यांच्या मार्गदर्शनाखाली गितेतील 15 व्या अध्यायाचे सामुहीक पठण केले. शेकडो महिला व पुरुषाच्या उपस्थितीत माजी मंत्री कोल्हे यांना श्रद्धांजली […]

Read More

शेतक-यांची नेतृत्व संजीवनी हरपली:-गृहमंत्री दिलीप वळसे…

कोपरगांव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात दबदबा असणारे व्यक्तीमत्व आणि आयूष्यभर शेतक-यांच्या छोटया छोटया प्रश्नांसाठी संघर्ष करणारे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने शेतक-यांची नेतृत्व संजीवनी हरपली अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी श्रध्दांजली वाहिली.रविवारी सायंकाळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येसगांव कोल्हे वस्ती येथे येत कोल्हे कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी सिंधुताई […]

Read More

काळाच्या पुढे जात विकासाची दृष्टी असणारा सर्वमान्य नेता हरपला:-कैलास ठोळे…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे म्हणजे व्हीजनरी मॅन, शेतक-यांची शेती कमी खर्चात अधिक उत्पादन कशी देईल हा ध्यास असणारे, काळाच्या कितीतरी पुढे जात त्यानुरूप धोरणे आखून काम करणारे, विकासाची फळे तुम्हां-आम्हाला चाखायला देणारे सर्वमान्य नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले अशा शब्दात महाराष्ट्र राज्य पेस्टीसाईडस असोसिएशनचे माजी अध्यक्ष, उद्योगपती कैलास ठोळे यांनी श्रध्दांजली वाहिली.कोपरगांव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात […]

Read More

विकासकामे थांबविणाऱ्यांची गय केली जाणार नाही राष्ट्रवादी आक्रमक…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहराच्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी व कोपरगाव शहरातील जनतेचे होत असलेले हाल थांबविण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी विशेष प्रयत्न करून त्यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या मिळविलेल्या निधीतून तसेच विविध खात्यांकडून शहरविकासासाठी मिळालेल्या निधीतून मे सुरु झालेली विकास कामे थांबली आहेत. त्यामुळे नागरीकांना त्रास […]

Read More

छत्रपती मुळेच मंदिरावर कळस आणि अंगणात तुळस राहिली:- महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज…

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्या अंगणात तुळस व आपल्या गावातील मंदिरावर कळस शाबूत राहिले असे प्रतिपादन राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौंनगिरीजी महाराज यांचे महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी बोलकी येथे आयोजित सत्संग व बाबाजींच्या पादुकांच्या चांदीचा रथ मिरवणूक प्रसंगी आपल्या प्रवचनातून केली.जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या कृपाशीर्वादाने व महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज […]

Read More

भरतजी मोरे यांनी आई काशाबाई आसाराम मोरे यांच्या विषयी शब्दरुपी मांडल्या हळव्या भावना…

कोपरगाव प्रतिनिधी:-माझी माय, माऊली,माता,जननी,जन्मदात्री,..आमच्या सात बहिण भावंडांची आईला आम्ही म्हणायचो,.. बाईला देवा तू सतरा वर्षांपूर्वी आमच्याकडून हिसकावून घेतलं,….देवा बाई दादाच्या पुण्याईनं आज आमचं सुख पाहण्यासाठी देवा तु आमच्यावर जाणूनबुजून अन्यायच केला बर का..?,..कारण देवा तुझं स्मरण झाल्याशिवाय सुर्योदय आधीचा घरचा गरम पाण्याचा बंब पेटत नव्हता आणि रामप्रहरी देवघरातल्या घंटीनादाशिवाय गाढ झोपलेल्या घरसदस्यांची झोप उडत नव्हती,…दारात […]

Read More

पालकमंत्री मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते रुमण्याचा मानकरी’ काव्य संग्रहाचे प्रकाशन…

‘रुमण्याचा मानकरी’ काव्य संग्रहातून ग्रामीण संस्कृतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न:-मंत्री छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- बदलत्या काळानुसार कृषी संस्कृतीतल्या जुन्या स्मृती त्यांनी विस्मृतीत न टाकता त्यांना उजाळा दिला आहे. विविध विषयाची मांडणी करणारा हा काव्य संग्रह ग्रामीण जीवनाच्या चरित्राचा भाग वाखाणण्याजोगा आहे. रुमण्याचा मानकरी काव्य संग्रहातून ग्रामीण संस्कृतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी […]

Read More