शेतक-यांची नेतृत्व संजीवनी हरपली:-गृहमंत्री दिलीप वळसे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात दबदबा असणारे व्यक्तीमत्व आणि आयूष्यभर शेतक-यांच्या छोटया छोटया प्रश्नांसाठी संघर्ष करणारे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने शेतक-यांची नेतृत्व संजीवनी हरपली अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी श्रध्दांजली वाहिली.
रविवारी सायंकाळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येसगांव कोल्हे वस्ती येथे येत कोल्हे कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी सिंधुताई कोल्हे, नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलीमा वसंतराव पवार, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, डॉ. मिलींदराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयूटचे कार्यकारी विश्वस्थ अमितदादा कोल्हे, सुमितदादा कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेकदादा कोल्हे, प्रणव वसंतराव पवार, वेदांग मिलींद कोल्हे, ईशान बिपिनदादा कोल्हे, डॉ. प्राची वसंतराव पवार, अमृता वसंतराव पवार, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, सर्व आजी माजी संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी, आदि उपस्थित होते.
श्री. दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले की, शंकरराव कोल्हे यांनी आपल्याला मुलाप्रमाणे प्रेम दिले. अहमदनगर जिल्हयाचा पालकमंत्री आणि राज्याचा उर्जा मंत्री म्हणुन काम केले त्यावेळी ते सर्वात अनुभवी व्यक्तीमत्व होते त्यांनी स्वतःच्या महत्वकांक्षा मागे ठेवत आम्हा तरूणांना पुढे करून राज्याच्या मंत्रीमंडळात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आपल्या कामकाजाविषयी ख्याली खुशालीचे शंकरराव कोल्हे यांचे ३ मार्च रोजीचे पत्र मला प्राप्त झाल्यावर आपणही त्यांना पत्र पाठवून वाढदिवसाला २४मार्च रोजी येतो म्हणून कळविले होते पण नियतीने त्याच्या आताच त्यांना बोलावुन घेतले. साखर उद्योग, समाजकारण, पाणी, सहकार, कृषि, जागतिकीकरण, विकसीत, विकसनशिल देशातील शेती आणि शेतकरी व त्यांचे प्रश्न आगामी २५ वर्षात राज्यावर ओढावणा-या आपत्ती इत्यादी छोटया छोटया घटकावर त्यांचा सखोल अभ्यास होता., त्यातुन उपाययोजना सुचवत आपली भूमिका बेधडकपणे मांडुन शेतक-याच्या देहबोलीशी ते प्रामाणिक राहुन आधूनिक माहिती तंत्रज्ञान आणि ग्रामिण अर्थकारणाच्या उन्नतीसाठी असंख्य पायलट प्रकल्प राबवत व यशस्वीही करून दाखविले. सर्वांना सांभाळून समाजकारण करणारा नेता आपल्यातुन गेला असेही ते म्हणाले.

फोटोओळी:-कोपरगाव
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कोल्हे कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *