भरतजी मोरे यांनी आई काशाबाई आसाराम मोरे यांच्या विषयी शब्दरुपी मांडल्या हळव्या भावना…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
माझी माय, माऊली,माता,जननी,जन्मदात्री,..आमच्या सात बहिण भावंडांची आईला आम्ही म्हणायचो,.. बाईला देवा तू सतरा वर्षांपूर्वी आमच्याकडून हिसकावून घेतलं,….देवा बाई दादाच्या पुण्याईनं आज आमचं सुख पाहण्यासाठी देवा तु आमच्यावर जाणूनबुजून अन्यायच केला बर का..?,..कारण देवा तुझं स्मरण झाल्याशिवाय सुर्योदय आधीचा घरचा गरम पाण्याचा बंब पेटत नव्हता आणि रामप्रहरी देवघरातल्या घंटीनादाशिवाय गाढ झोपलेल्या घरसदस्यांची झोप उडत नव्हती,…दारात आलेला भिक्षेकरी कधी उपाशी जात नव्हता,… साधुसंतांची सेवा तर कुटूंबा वरच्या जिव्हाळ्यापेक्षाही अधिक केली जात होती,… अमावास्या मागायला आलेल्या माय-भगिनीला साडीचोळी शिवाय दारातून खाली हात जाऊ दिलं जात नव्हतं,…नळला आलेलं पाणी पहीले दारातल्या तुळशीला घालून मंगच घरच्या रांजणात भरलं जात होतं,..सर्वच बारामाही सणावेळी देवघरातल्या देवतांना आणि भटक्या जनावरांच्या मुखात नैवेद्य चढवल्या शिवाय घरात पंगत बसत नव्हती,… गोमूत्र शिवाय अंगणात गोमूत्र आणि पाणी मिश्रीत सडा पडतंच नव्हता,…अशी आमची माय माऊली,..आमची बाई देवा तिला तुझ्याकडं सुखी ठेव,..कारण तिनं आम्हांला तळहातावच्या फोडा सारखं जपलं होतं ,…स्वताहा उपाशी झोपली पण भाकरीचा तुकडा आमच्या पोटात भरून ती खोटा ढेकर देत सगळेच जेवले झोपा आता अश्या खोट्या स्मितहास्याने झोपी जात,‌..स्वताहा शिळं अन्न खायची पण गरम जेवन आमच्या ताटात वाढायची,.. विचारलं तर मला शिळचं आवडतं अशी म्हणून नेहमीप्रमाणे आम्हांला निशब्द करायची,…माहेरी श्रीमंती होती पण नव-याच्या घरात सौ.ते श्रीमती पर्यंत नव-याच्या स्वाभिमानासाठी शेवटपर्यंत अभिमानी राहीली,आम्हांलाही तसंच घडवलं,….जगातल्या सर्वच माय माऊलीन सारखा संघर्ष तिनही केला ,..स्वताहा अशिक्षित असूनही स्पर्धात्मक ज्ञानगंगेच्या महापुरात कुटुंबाची गळकी होडी हिमतीनं किनारी लावली..,पण बाई आम्हांला आजही आठवतं तु अपमानाला ईनसल्ट म्हणायची अर्थात तू आम्हांला शिकवता शिकवता तूही शिक्षीत होत होती,….
देवा तिला मखमली गादीच्या चोपाळ्यात झुलव कारण ती आयुष्यभर काटेरी प्रवासात झुरत राहीली,…देवा तिला एकदा तरी अमृत पाजून अमर होवू दे कारण ती कुटूंबासाठी जीवनभर विष पिऊन जगता जगता मरत राहीली,….देवा तिला सोन्या चांदीचे,हि-या मोतीचे लुगडं नेसून कशी दिसते मला स्वप्नात दाखव कारण कधीही नवीन साडीचा मोह न करणारी माझी माय माऊली आहे त्या साड्या गरजूंना नेसवत असायची,…..
देवा पत्र तिला वाचून दाखव आणि आम्ही सर्व सुखी आहोत तिला कळव,…आणि बरं का देवा या जगावरचं कोरोनाचं संकटही कायमचं जाऊ दे,..पुन्हा कोणतीही रोगराई नको येवू देवू.
,…हे परमेश्वरा तुला पुन्हा एकच विनंती जन्म पुन्हा मिळाला तर बाईच्याच पोटी जन्मू दे,..कारण आमची बाई ही सगळ्यांचीच जणू आई होती,माय माऊली होती.
देवा तुझा भक्त.
बाईचा मुलगा,भरत मोरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *